'मेहनत मी केली, पण मुख्यमंत्रीपद दुसऱ्याला मिळाले'; Powerful काँग्रेस नेत्याने मनातली सल बोलली
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Congress President Mallikarjun Kharge: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी तब्बल 25 वर्षांपूर्वीची राजकीय वेदना पहिल्यांदाच उघड केली आहे. 1999 मध्ये मेहनत खरगेंनी केली. पण मुख्यमंत्रीपद मात्र दुसऱ्याच्या गळ्यात घातलं गेलं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या मनातील 25 वर्षापासून मनात असलेली वेदना बोलून दाखवली. खर्गे यांनी प्रथमच सांगितले की १९९९ मध्ये काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी त्यांनी ज्या प्रकारे मेहनत घेतली, त्याचे फळ मात्र दुसऱ्याला मिळाले. मेहनत मी केली, पण मुख्यमंत्रीपदाची खुर्ची एस.एम. कृष्ण यांना मिळाले.
खर्गे म्हणाले की, त्या काळात ते काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे (CLP) नेते होते आणि पक्षाला सत्तेपर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यांनी जीव तोड मेहनत घेतली होती. पण जेव्हा पद मिळवण्याची वेळ आली, तेव्हा त्यांना बाजूला काढण्यात आले.
स्वामीजींसमोर भावना व्यक्त
बेळी मठाचे स्वामीजी यांच्यासमोर भावूक होत खर्गे म्हणाले, स्वामीजी, मी जे सेवा दिली होती, ती व्यर्थ गेली.
advertisement
त्यांनी स्पष्ट केलं की त्यांनी कधीच सत्तेची लालसा ठेवली नाही. नेहमीच पक्ष आणि जनतेची सेवा यावर विश्वास ठेवला.
ते म्हणाले, मी ब्लॉक अध्यक्षापासून एआयसीसी (AICC) अध्यक्षपदापर्यंत पोहोचलो, पण कधीही पदासाठी धाव घेतली नाही, जे मिळालं ते आपसूक मिळालं.
खर्गे यांनी ताकद दाखवली
हे वक्तव्य अशा वेळी आलं आहे जेव्हा खर्गे देशाच्या सर्वात जुन्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि काँग्रेसने 2024 लोकसभा निवडणुकीत दक्षिण भारतात विशेषतः कर्नाटकात चांगलं यश मिळवलं आहे. मात्र त्यांचं हे विधान दर्शवतं की, राजकारणातील यश जितकं वरून सरळ वाटतं तितकं ते प्रत्यक्षात नसतं.
advertisement
कोणावर संकेत?
view commentsखर्गे यांनी स्पष्ट केलं की ते सत्तेच्या शर्यतीत कधीच नव्हते, त्यांचा विश्वास सेवा आणि पक्षाच्या योगदानावर होता. त्यांचं हे वक्तव्य कदाचित डी.के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्याकडे सूचक इशारा असू शकतो. कारण वारंवार अशा बातम्या येतात की डीके शिवकुमार मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करतात. पण सिद्धरामय्या खुर्ची सोडण्यास तयार नाहीत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 27, 2025 11:54 PM IST
मराठी बातम्या/देश/
'मेहनत मी केली, पण मुख्यमंत्रीपद दुसऱ्याला मिळाले'; Powerful काँग्रेस नेत्याने मनातली सल बोलली


