CRPF Jawan Arrest : सुरक्षा दलाच्या जवानाची पाकसाठी हेरगिरी, पहलगाम हल्ल्याशी कनेक्शन? समोर आली मोठी अपडेट
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
CRPF Jawan Arrest : राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने केंद्रीय राखीव पोलीस दलातील (CRPF) सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) मोती राम जाट यांना पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने केंद्रीय राखीव पोलीस दलातील (CRPF) सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) मोती राम जाट यांना पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. मोती राम जाट याने ऑक्टोबर २०२३ पासून सुरक्षेसंबंधी संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली असल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीचं पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी कनेक्शन आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा मोती राम जाट हा CRPF च्या ११६ व्या बटालियनमध्ये कार्यरत होता. त्याने विविध माध्यमांतून पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून पैसे घेतले. मोती राम जाट याने भारतीय सैन्याच्या हालचाली, तळांची माहिती आणि सुरक्षा योजनांची माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात न्यायालयाने त्याला ६ जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे.
पहलगाम हल्ल्याशी कनेक्शन?
advertisement
सीआरपीएफचा आरोपी जवान मोती राम जाट याचा पहलगाम हल्ल्याशी कनेक्शन आहे का, याचीही चौकशी केली जात आहे. आरोपी मोती राम जाट हा पहलगाममध्येच तैनात होता. २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या सहा दिवस आधीच त्यांची तिथून बदली करण्यात आली होती. त्यामुळे त्याने पाकिस्तानला दिलेल्या माहितीचा आणि पहलगाम हल्ल्याचा काही संबंध आहे का, याचाही कसून तपास होण्याची शक्यता आहे.
advertisement
दरम्यान, मोती राम जाट याला अटक करण्यात आल्यानंतर सीआरपीएफने त्याची नोकरीवरून हकालपट्टी केली आहे. मोती राम हा पाकिस्तानच्या मोठ्या हेरगिरी रॅकेटचा भाग असण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसात युट्युबर आणि इतरांना पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
May 27, 2025 12:20 PM IST
मराठी बातम्या/देश/
CRPF Jawan Arrest : सुरक्षा दलाच्या जवानाची पाकसाठी हेरगिरी, पहलगाम हल्ल्याशी कनेक्शन? समोर आली मोठी अपडेट