Cyclone Michaung : चक्रीवादळाचा तांडव कायम; 204 ट्रेन अन् 70 उड्डाणं रद्द, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम?
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
बंगालच्या उपसागरातून 2 डिसेंबर रोजी उद्भवलेले चक्रीवादळ मिचॉन्ग आज सकाळी 12 वाजण्यापूर्वी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकू शकतं.
नवी दिल्ली 05 डिसेंबर : बंगालच्या उपसागरातून 2 डिसेंबर रोजी उद्भवलेले चक्रीवादळ मिचॉन्ग आज सकाळी 12 वाजण्यापूर्वी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकू शकतं. हवामान विभागाच्या मते, या काळात 90 ते 110 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पुद्दुचेरीमध्ये वादळाचा प्रभाव जाणवेल. या राज्यांमध्ये एसडीआरएफ आणि एनडीआरएफची टीम तैनात आहे.
या वादळामुळे आतापर्यंत 204 ट्रेन आणि 70 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे चेन्नईसह तामिळनाडूतील काही जिल्ह्यांमध्ये सोमवारपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सखल भागात पाणी साचल्यानं मोठं नुकसान झालं आहे. चेन्नई, चेंगलपेट, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे.
Cyclone Michaung : या 2 राज्यांमध्ये धडकणार मिचॉन्ग चक्रीवादळ, मुसळधार पावसाचा इशारा, 144 ट्रेन रद्द
advertisement
पावसासोबतच जोरदार वारंदेखील असल्यामुळे चेन्नई विमानतळावरील अनेक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. ही विमान वाहतूक बेंगळुरूच्या दिशेनं वळवण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नागरिकांसाठी इर्मजन्सी नंबरची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य सरकारने ज्या भागात या वादळाचा सर्वाधिक फटका बसू शकतो अशा भागांमध्ये एनडीआरएफची पथक तैनात केली आहेत
advertisement
या चक्रिवादळामुळे महाराष्ट्रात देखील काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस आग्नेय मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यावर कोणतीही वातावरणीय प्रणाली सक्रिय नाही. पण, बंगालच्या उपसागरात मिचॉन्ग चक्रीवादळ तयार झाले आहे. चक्रीवादळ मिचॉन्ग हिंदी महासागरातलं यंदाच्या वर्षातलं सहावं तर बंगालच्या खाडीतलं चौथं वादळ आहे. या चक्रीवादळाला म्यानमारने नावं दिलं होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 05, 2023 7:09 AM IST
मराठी बातम्या/देश/
Cyclone Michaung : चक्रीवादळाचा तांडव कायम; 204 ट्रेन अन् 70 उड्डाणं रद्द, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम?