Delhi Car Explosion: दिल्लीत मोठा स्फोट, लाल किल्ला परिसरात कारमध्ये झाला ब्लास्ट; गाडीच्या चिंधड्या उडाल्या

Last Updated:

Delhi explosion: देशाची राजधानी नवी दिल्लीत स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दिल्लीतील प्रसिद्ध लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात एका कारमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त आहे.

News18
News18
नवी दिल्ली: देशाची राजधानी नवी दिल्लीत स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दिल्लीतील प्रसिद्ध लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात एका कारमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त आहे. ज्या कारमध्ये स्फोट झाला त्यामुळे इतर दोन गाड्यांना देखील आग लागल्याचे समजते.
advertisement
हा स्फोट एक अपघात आहे की दहशतवादी हल्ला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र सुरक्षा यंत्रणा सर्व अँगलने याचा तपास करत आहेत.
advertisement
याबाबत अद्याप अधिक काही तपशील मिळालेला नाही. सुरक्षा यंत्रणा याबाबत तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
- दिल्लीच्या कारमध्ये स्फोट
-लाल किल्याच्या मेट्रो ट्रेनच्या गेट नंबर 1 जवळ घडला प्रकार
-6 वाजून 45 मिनिटांनी स्फोट झाल्याची माहिती
-3 कारमध्ये आग लागली
स्फोटानंतर तीन गाड्यांना आग
advertisement
स्फोटानंतर लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात उभ्या असलेल्या तीन गाड्यांना आग लागली. स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की आगीत गाड्यांच्या चिंधड्या उडाल्या. जवळपास उभ्या असलेल्या गाड्यांना तत्काळ तिथून हलविण्यात आले.
सुरक्षा स्थिती
घटना ठिकाण म्हणजे लाल किल्ल्याचा परिसर, जो दिल्लीतील अत्यंत गर्दीचा आणि सुरक्षिततेने भरलेला ठिकाण मानला जातो. या प्रकारामुळे त्वरित परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असून तज्ञ आणि अग्निशमन दल घटनास्थळी पाठवले गेले आहेत.
advertisement
-स्फोटानंतर ताबडतोब प्रवेशद्वारे वाहनांची वाहतूक विस्थापित करण्यात आली आहे.
-गेट 1 परिसराच्या आसपास नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं मार्गदर्शन देण्यात आलं आहे.
-मेट्रो स्‍टेशन आणि आसपासच्या भागातील सुरक्षा तपासणी वाढवण्यात आली आहे.
महत्त्वाचे मुद्दे
-स्फोटाचा कारण काय आहे याबाबत अग्रिम तपास सुरू आहे.
advertisement
-घटनास्थळावरून स्फोटासाठी वापरलेलं साहित्य आणि वाहनाची परवानगी यांची चौकशी केली जात आहे.
-काही जखमी झाल्याच्या किंवा इतर वाहनं तसेच इमारतींना नुकसान झाल्याची अद्याप अधिकृत पुष्टी उपलब्ध झालेली नाही.
नागरिकांसाठी सूचना
-लाल किल्ला आणि आसपासच्या मेट्रो स्थानकांपासून सध्या अंतर ठेवण्याचं आणि परिस्थिती साधण्यासाठी पोलिसांचा निर्देश पाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
advertisement
-सार्वजनिक वाहतूक वा स्थानकांमध्ये अचानक गर्दी किंवा अस्वस्थ स्थिती आढळल्यास ती तात्काळ पोलिस किंवा सुरक्षाकर्मीला कळवावी.
-कोणत्याही संदिग्ध वस्तू किंवा हालचाली दिसल्यास तांत्रिक तपासणी होईपर्यंत स्थानांतरण टाळावा.
- या स्फोटामुळे राजधानीमध्ये पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.
धक्कादायक म्हणजे आजच दहशतवादविरोधी कारवाई करताना पोलिसांना मोठं यश मिळाले होते. हरयाणातील फरिदाबादमधील एका डॉक्टरच्या घरावर जम्मू काश्मीर पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात अंदाजे ३०० किलो आरडीएक्स (स्फोटके) जप्त केले होती. त्याशिवाय, एके-४७ रायफल आणि जिवंत काडतूसे मिळाले होते. या घटनेनंतर आता रात्री दिल्लीत स्फोट झाल्याचे वृत्त आलेल्या एकच खळबळ उडाली आहे. 
view comments
मराठी बातम्या/देश/
Delhi Car Explosion: दिल्लीत मोठा स्फोट, लाल किल्ला परिसरात कारमध्ये झाला ब्लास्ट; गाडीच्या चिंधड्या उडाल्या
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement