Delhi Lal Qila Blast : घटनास्थळी रिपोर्टिंग सुरू होती अन् कॅमेऱ्यात कैद झाला स्फोटाचा LIVE VIDEO, सेकंदात सगळं उद्धवस्त
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Delhi Lal Qila Blast Video Recorded : संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यानंतर लोकांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचं पहायला मिळालं आहे.
Delhi Lal Qila Blast Live Video : पुन्हा एकदा राजधानी दिल्ली स्फोटाने हादरली. सोमवारी संध्याकाळी लोक ऑफिसवरून घरी जात असताना अंदाजे 6:52 वाजता मोठा स्फोट झाला. लाल किल्ल्यापासून 100 मीटर अंतरावर हा स्फोट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. लाल किल्ल्याच्या गेट नंबर 1 च्या जवळ असलेल्या सिग्नलवर हा स्फोट झाला. यामध्ये आत्तापर्यत 13 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता घटनेचा लाईव्ह व्हिडीओ समोर आला आहे.
घटना कॅमेऱ्यात कैद
सोशल मीडियावरून समोर आलेल्या व्हिडीओमध्ये लाल किल्ल्याजवळ काहीजण व्हिडीओ शूट करत होते. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची मुलाखत घेत होता. त्याचवेळी लाल किल्ल्याजवळ एका मोठा स्फोट झाला. आगीचे उंचउंच डोंब दिसून आले. संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यानंतर लोकांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचं पहायला मिळालं आहे.
advertisement
पाहा Video
Exact moment when the Delhi blast took place earlier today near Red Fort in India’s National Capital. pic.twitter.com/LVdxd3ets7
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) November 10, 2025
अमित शहा काय म्हणाले?
दिल्लीतील स्फोटात झालेल्या जीवितहानीमुळे शब्दांतून व्यक्त करता येणार नाही असे दुःख आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती माझी तीव्र संवेदना आहे. स्फोटस्थळाला भेट दिली आहे आणि रुग्णालयात जखमींनाही भेटलो आहे. त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो.
advertisement
सर्व शक्यता तपासून पाहत आहोत - अमित शहा
वरिष्ठ संस्था या घटनेची पूर्ण तीव्रतेने चौकशी करत आहेत आणि या घटनेचा सखोल अभ्यास करतील. चौकशीचे आदेश: आसपासच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे (CCTV Footage) फुटेज आणि इतर संबंधित वस्तूंची कसून तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. तपास पथक: दिल्ली पोलीस आयुक्त आणि विशेष शाखेचे प्रमुख (Special Branch Chief) स्वतः घटनास्थळी आहेत आणि ते सर्व शक्यता तपासून पाहत आहेत.
advertisement
PM मोदी काय म्हणाले?
आज संध्याकाळी दिल्लीत झालेल्या स्फोटात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती संवेदना. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना. बाधितांना अधिकाऱ्यांकडून मदत केली जात आहे. गृहमंत्री अमित शहा आणि इतर अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला.
view commentsLocation :
Delhi Cantonment,New Delhi,Delhi
First Published :
November 11, 2025 7:57 AM IST
मराठी बातम्या/देश/
Delhi Lal Qila Blast : घटनास्थळी रिपोर्टिंग सुरू होती अन् कॅमेऱ्यात कैद झाला स्फोटाचा LIVE VIDEO, सेकंदात सगळं उद्धवस्त


