Weather Update: धुक्यांच्या विळख्यात दिल्ली! थंडीमुळे देशातील अनेक भागात शाळाही बंद; महाराष्ट्रात काय स्थिती?

Last Updated:

Weather Update 28 December 2023: देशभरात थंडीचा विळखा वाढला आहे. उत्तर भारतात तर धुक्याची चादर पसरलीये. यामुळे बऱ्याच ठिकाणी शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.

वेदर अपडेट
वेदर अपडेट
नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील सर्व राज्ये कडाक्याची थंडी आणि धुक्याच्या विळख्यात आहेत. पुढील तीन दिवस धुके आणि थंडीची लाट कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तापमानातही घट अपेक्षित आहे. धुके आणि थंडीमुळे काही ठिकाणी शाळा बंद ठेवण्यात आल्या असून काही ठिकाणी शाळेचा टायमिंग बदलण्यात आला आहे.
गाझियाबादमध्ये शाळांच्या वेळा बदलल्या
गाझियाबादमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांची वेळ बदलण्यात आली आहे. 28 डिसेंबरपासून शाळा सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहील. या संदर्भात मूलभूत शिक्षणाधिकारी (BSA) यांनी आदेश जारी केले आहेत. अलिगडमध्येही थंडीमुळे पुढील दोन दिवस शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यूपी बोर्ड ते सीबीएसई, आयसीएसई बोर्डापर्यंतच्या शाळा 29 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. जालौनमध्येही 1 ली ते 8 वी पर्यंतच्या शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहतील. उत्तर प्रदेशातील एटामध्येही 28 डिसेंबरला पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
advertisement
विदर्भातील विविध भागात हलका पाऊस पडू शकतो 
पुढील दोन दिवस कडाक्याच्या थंडीचा अंदाजही हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. IMD नुसार, नवीन वर्षाची सुरुवात दिल्लीत दाट धुक्याने होईल. याशिवाय वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम दिल्ली-एनसीआरवर दिसू शकतो. 30 डिसेंबरपासून उत्तर-पश्चिम भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होऊ शकतो. त्याच्या प्रभावामुळे 31 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भाच्या विविध भागात हलका पाऊस पडू शकतो.
advertisement
गुरुवारच्या हवामानाविषयी बोलायचं झाल्यास, स्कायमेट वेदरच्या रिपोर्टनुसार पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानच्या अनेक भागांमध्ये दाट धुके कायम राहू शकते. मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, ओरिसा आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागात मध्यम धुके पडण्याची शक्यता आहे. ईशान्य भारत आणि किनारपट्टी तमिळनाडूमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
advertisement
महाराष्ट्रात काय स्थिती?
महाराष्ट्रामध्येही अनेक भागांमध्ये थंडीत वाढ झाली आहे. दरम्यान वातावरणात चढ-उतार पाहायला मिळतात. उत्तर भारतात थंडीची लाट पसरली असल्याने याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसून येतोय. याच कारणामुळे मुंबई, ठाणे, पालघरमध्ये सकाळी आणि रात्री तापमानात मोठी घसरण पाहायला मिळतेय. तर दुपारच्या वेळी थंडी किंचित कमी झालेली दिसते. दरम्यान आजही राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानात घसरण झाल्याची पाहायला मिळेल. तसंच वर्षाच्या अखेरीस म्हणजेच 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाजही आयएमडीने वर्तवला आहे.
मराठी बातम्या/देश/
Weather Update: धुक्यांच्या विळख्यात दिल्ली! थंडीमुळे देशातील अनेक भागात शाळाही बंद; महाराष्ट्रात काय स्थिती?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement