'आई मला त्रास होतोय...', टाके घालण्याऐवजी फेविक्विकने जखम चिकटवली, डॉक्टरचे अडीच वर्षांच्या मुलावर क्रुर उपचार
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
अडीच वर्षांच्या मुलाच्या डोळ्यावर उपचार करताना रुग्णालयाने फेविक्विक लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
अडीच वर्षांच्या मुलाच्या डोळ्यावर उपचार करताना रुग्णालयाने फेविक्विक लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अडीच वर्षांच्या या लहान मुलाला खेळत असताना डोळ्याला दुखापत झाली, यानंतर मुलाचे पालक त्याला एका खासगी रुग्णालयात घेऊन गेले. रुग्णालयात डॉक्टरांनी मुलाच्या डोळ्यावर झालेल्या जखमेवर टाके घालण्याऐवजी फेविक्विक लावलं, यानंतर मुलाच्या डोळ्याची दुखापत वाढली तेव्हा पालक त्याला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन गेले. 3 तासांच्या मेहनतीनंतर डॉक्टरांनी मुलाच्या डोळ्यावरचं फेविक्विक हटवलं आणि टाके घातले. आता याप्रकरणी मुलाच्या पालकांनी मुख्यमंत्री कार्यालयात तक्रार दाखल केली आहे.
उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली आहे. याप्रकरणी मुलाच्या डोळ्याला फेविक्विक लावणाऱ्या डॉक्टरची चौकशी सुरू झाली आहे. मेरठच्या जागृती विहार परिसरातील एका आलिशान सोसायटीमध्ये सरदार जसपिंदर सिंग राहतात. सरदार जसपिंदर सिंग यांचा मुलगा घरी खेळत असताना त्याचं डोकं टेबलाच्या कोपऱ्यावर आदळले आणि रक्तस्त्राव सुरू झाला. यानंतर कुटुंबाने त्याला भाग्यश्री रुग्णालयात नेलं, यानंतर रुग्णालयातल्या डॉक्टरांनी आपल्याला 5 रुपयांची फेविक्विक आणायला सांगितलं, ही फेविक्विक डॉक्टरांनी जखम बंद करण्यासाठी वापरली, असा आरोप पालकांनी केला आहे.
advertisement

आमचा मुलगा वेदनेने रडत होता, पण मुलगा फक्त घाबरला आहे, त्याच्या वेदना कमी होतील, असं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं, पण मुलगा रात्रभर अस्वस्थ होता त्यामुळे आम्ही त्याला लोकप्रिया रुग्णालयात नेलं, तिथल्या डॉक्टरांना जखमेवरील कडक चिकटपणा काढायला तीन तास लागले. जखम झालेला भाग साफ केल्यानंतर त्यांनी जखम बंद करण्यासाठी चार टाके घातले, असंही पालकांनी सांगितलं आहे.
advertisement
फेविक्विक मुलाच्या डोळ्यात गेलं असतं, तर आणखी गंभीर घटना होऊ शकली असती. मेरठचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक कटारिया यांनी याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती दिली आहे. चौकशी समितीच्या निष्कर्षांच्या आधारे कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया डॉ. अशोक कटारिया यांनी दिली आहे.
view commentsLocation :
Meerut,Uttar Pradesh
First Published :
November 21, 2025 4:45 PM IST
मराठी बातम्या/देश/
'आई मला त्रास होतोय...', टाके घालण्याऐवजी फेविक्विकने जखम चिकटवली, डॉक्टरचे अडीच वर्षांच्या मुलावर क्रुर उपचार


