निसर्ग कोपला! धरालीनंतर पुन्हा एकदा मोठा Cloudburst, VIDEO पाहून अंगावर येईल काटा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
डोडा जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटीमुळे 10 पेक्षा जास्त घरं वाहून गेली, शिव मंदिर आणि पांडू गुहा पाण्याखाली, वैष्णव देवी यात्रा थांबवली, बचावकार्य सुरू, परिस्थिती भीषण.
मुंबई: निसर्ग कोपणं काय असतं याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. धरालीनंतर पुन्हा एकदा उत्तर भारतात पावसाचं रौद्र रुप पाहायला मिळालं. ढगफुटी झाल्याने 10 पेक्षा जास्त घरं वाहून गेली आहे. संसार उद्ध्वस्त झाले, एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. जम्मू काश्मीरमधील डोडा इथे ढगफुटी झाली. किश्तवाडानंतर डोडा इथे मुसळधार पावसानं थैमान घातलं. ऐतिहासिक शिव मंदिर, पांडू गुहा पाण्याखाली गेली आहे. या भागात रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
ढगफुटी पावसामुळे 10 पेक्षा जास्त घरं वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे. अचानक नदीच्या पातळीत वाढ झाली आणि जे दिसेल ते घेऊन नदीनं रौद्र रुप धारण केलं. घरं, झाडं जे वाटेत येईल ते सगळं बेचिराख करत गेली. ढगफुटीमुळे नदी, नाले यांना महापूर आला, धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक भागांमधून लोकांना बाहेर काढलं जात आहे. पावसामुळे बचावकार्यात अडचणी येत असल्याची माहिती मिळाली आहे.
advertisement
#BreakingNews cloudburst in doda #Jammu #JammuAndKashmir #cloudburst pic.twitter.com/TGsX76m5gQ
— Swati Pandita (@SwatiPandita4) August 26, 2025
खराब हवामान, सध्याची परिस्थिती पाहता वैष्णव देवी यात्रा अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आली आहे. काही ठिकाणी दरड देखील कोसळली आहे. नदीच्या प्रवाहातून मोठे दगड देखील वाहून आले आहेत. घरांचं गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. कठुआ, मनाली, जम्मू, काश्मीर या भागांमधील नद्या पात्र सोडून वाहात आहेत. धोक्याची पातळी ओलांडली असून रौद्र रुप घेतलं आहे. रस्ते जलमय झाले आहेत. सध्या या भागांमधील परिस्थिती भीषण आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 26, 2025 2:12 PM IST


