बिहारच्या मतदार यादीत नेपाळ, बांगलादेशींसह म्यानमारच्या घुसखोरांचा समावेश, निवडणूक आयोगाच्या SIR मध्ये खुलासा
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
बिहारमधील मतदार यादीच्या SIR अर्थात Special Intensive Revision मध्ये निवडणूक आयोगाने धक्कादायक खुलासे करण्यास सुरुवात केली आहे.
बिहारमधील मतदार यादीच्या SIR अर्थात Special Intensive Revision मध्ये निवडणूक आयोगाने धक्कादायक खुलासे करण्यास सुरुवात केली आहे. आयोगातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील SIR दरम्यान घरोघरी भेटीदरम्यान, बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLOs) यांना नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमारमधून बेकायदेशीरपणे आलेले लोक मोठ्या संख्येने आढळले आहेत.
अंतिम यादी ३० सप्टेंबर २०२५ रोजी प्रकाशित केली जाईल
निवडणूक आयोगाच्या सूत्रांच्या मते, १ ऑगस्ट २०२५ नंतर, योग्य तपासणीनंतर, त्यांची नावं ३० सप्टेंबर २०२५ रोजी प्रकाशित होणाऱ्या अंतिम यादीत समाविष्ट केली जाणार नाहीत. ३० सप्टेंबरनंतर आयोग या संख्येचे आकडे देखील उघड करेल, अशी अपेक्षा आहे. बिहारमधील मतदार यादीच्या पुनरावलोकनांतर्गत मतदार गणना फॉर्म सादर करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
advertisement
८० टक्के मतदारांनी माहिती दिली
आतापर्यंत ८० टक्क्यांहून अधिक मतदारांनी स्वतःबद्दल आवश्यक ती माहिती दिली. यात मतदारांनी नाव, पत्ता, जन्मतारीख, आधार क्रमांक, मतदार ओळखपत्र क्रमांक प्रविष्ट करून फॉर्म सादर केले आहेत. तथापि, आयोगाने या कामासाठी २५ जुलै ही शेवटची तारीख निश्चित केली आहे. परंतु हे काम निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
advertisement
नाव न आल्यास काय करावे?
१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या मतदार यादीत ज्यांची नावे नाहीत, ते मतदान नोंदणी अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि नंतर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे अपील दाखल करू शकतात आणि त्यांच्या प्रमाणपत्रांसह त्यावर दावा करू शकतात. मतदारांची अंतिम यादी ३० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल.
बीएलओ ही कागदपत्रं मागितली जातायत
advertisement
- मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळ किंवा विद्यापीठाने दिलेले शैक्षणिक प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी)
- पासपोर्ट
- राज्य सरकार किंवा स्थानिक प्राधिकरणाने तयार केलेले कुटुंब नोंदणी
- १ जुलै १९८७ पूर्वी बँक, पोस्ट ऑफिस, एलआयसी इत्यादींनी दिलेले कोणतेही प्रमाणपत्र
- वन हक्क प्रमाणपत्र
- नियमित कर्मचारी किंवा पेन्शनधारकांचे ओळखपत्र
advertisement
- कायमस्वरूपी निवास प्रमाणपत्र
- सरकारच्या कोणत्याही जमिनीच्या किंवा घराच्या वाटपाचे प्रमाणपत्र
- सक्षम प्राधिकरणाने दिलेले जन्म प्रमाणपत्र
Location :
Patna,Bihar
First Published :
July 13, 2025 12:42 PM IST
मराठी बातम्या/देश/
बिहारच्या मतदार यादीत नेपाळ, बांगलादेशींसह म्यानमारच्या घुसखोरांचा समावेश, निवडणूक आयोगाच्या SIR मध्ये खुलासा