दिल्लीत UPSC आणि वन सेवा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील उमेदवारांचा सत्कार
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
दिल्लीत नियुक्त महाराष्ट्रातील सनदी अधिकाऱ्यांच्या पुढचे पाऊल या संस्थेच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच भारतीय वन सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील यशस्वी उमेदवारांचा सत्कार दिल्लीतल्या डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय भवनात यशस्वीरित्या संपन्न
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तसेच भारतीय वन सेवा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील यशस्वी उमेदवारांचा गौरव करण्यासाठी,दरवर्षी “पुढचे पाऊल” तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित सोहळ्याच्या सहाव्या पर्वाचा कार्यक्रम आज नवी दिल्ली इथल्या डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय भवनात दिमाखात पार पडला.या कार्यक्रमात अधिकारी म्हणून निवड झालेल्या 25 नवनियुक्त अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यंदाच्या या वार्षिक सत्कार समारंभाला युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या सचिव, आयएएस श्रीमती सुजाता चतुर्वेदी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक श्री सदानंद दाते यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे माजी सदस्य आणि परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सचिव श्री ज्ञानेश्वर मुळे ,आयएफएस (निवृत्त) , यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषवले. आकांक्षा आणि इच्छा यांना क्षमता आणि संभाव्यतेच्या तुलनेत तोलले पाहिजे. सगळ्या परीक्षार्थींनी यावर लक्ष द्यावे असे श्री ज्ञानेश्वर मुळे यांनी मार्गदर्शन केले.
advertisement
श्री सदानंद दाते यांनी नवनियुक्त अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारमुक्त प्रशासन यंत्रणेसाठी कर्मठपणे प्रयत्न करण्याचा मूलमंत्र दिला. अधिकाऱ्याने त्यांच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ या दोंघाकडून शिकण्याची तयारी ठेवावी . महत्त्वाकांक्षा आणि मूल्य यामध्ये निवड अधिकाऱ्यास करावी लागते असे दाते यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
श्रीमती सुजाता चतुर्वेदी यांनी मार्गदर्शन करताना परीक्षार्थीना स्वतःला ओळखण्याचा सल्ला दिला.त्यांनी अपयश हा शब्द डिक्शनरी तून काढून टाकण्यास सांगितले.त्यांनी अधिकाऱ्यांना सोशल मीडियाच्या ग्लॅमर पासून दूर राहण्याचा मोलाचा सल्ला दिला.
advertisement
पुढचे पाऊल तर्फे या उपक्रमपर सत्कार सोहळ्याचा पहिला कार्यक्रम 2018 साली झाला होता. युवा सनदी अधिकारी नागरी सेवा क्षेत्रात पाऊल टाकत असताना, त्यांना दिल्लीमध्ये नियुक्त महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी देणारे,आणि त्या माध्यमातून त्यांना आपल्या कारकिर्दिला दिशादर्शक ठरणारे अमूल्य मार्गदर्शन मिळावे, यासाठीचे अभिनव व्यासपीठ उपलब्ध करून देता यावे या उद्देशानेच या कार्यक्रमाला सुरुवात केली गेली होती. आज झालेल्या या कार्यक्रमात एका विशेष सत्रात निवड झालेल्या उमेदवारांचे प्रेरणादायी अनुभव सादर केली गेले आणि या सत्रामुळे उपस्थित स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन मिळाले. एका अर्थाने या कार्यक्रमाच्या निमित्ताने केला जात असलेला हा सामुहिक प्रयत्न म्हणजे लोकसेवेच्या उद्देशाला चालना देणाचाच प्रयत्न आहे. पुढचे पाऊल या संस्थेने नूतन मराठी शाळेचे नविनिकरण आणि जे एन यू विद्यापीठात शिवाजी महाराज यांच्या जीवनावर अभ्यासासाठी पुढाकार घेतला आहे असे सुशील गायकवाड यांनी सांगितले.
advertisement
गेल्या काही वर्षांत पुढचे पाऊल या उपक्रमाअंतर्गत दिल्लीमध्ये नियुक्त झालेल्या 100 पेक्षा जास्त मराठी अधिकाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत दरवर्षी सर्वोत्तम कामगिरी केलेल्या 30 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांचा सत्कार केला जातो आहे.यासोबतच सुमारे 600 इच्छुक उमेदवारही दरवर्षी या कार्यक्रमाला उपस्थित राहात आले आहेत.
advertisement
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पुढचे पाऊल चे अध्यक्ष श्री सुशील गायकवाड, उपाध्यक्ष संतोषकुमार चाळके, सचिव डॉ. रेखा रायकर कुमार, श्री आनंद पाटील, श्री ऋषिकेश कोडगी आणि श्री ज्ञानेश्वर वीर यांच्या अथक प्रयत्नांमुळेच शक्य झाले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 23, 2024 11:04 AM IST
मराठी बातम्या/देश/
दिल्लीत UPSC आणि वन सेवा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील उमेदवारांचा सत्कार


