G20 समीट म्हणजे काय? याचे सदस्य कोणते देश आहेत? 10 मुद्द्यांमधून समजून घ्या
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
G20 समिट म्हणजे काय आणि त्याची स्थापना कधी झाली?
नवी दिल्ली - 8 ते 10 सप्टेंबरदरम्यान दिल्लीत G20 देशांची बैठक होणार आहे. भारतात पहिल्यांदाच एवढी मोठी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली जात आहे. G20 बैठकीत अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन, जपानसह अनेक मोठ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष सहभागी होणार आहेत. अशा परिस्थितीत G20 काय आहे? ती बैठक का आयोजित केली जाते? G20 चे आयोजन केल्याने भारताला काय फायदा होईल? असे प्रश्न लोकांना पडणं स्वाभाविक आहे. आपण याच सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात.
1. G20 समिट म्हणजे काय आणि त्याची स्थापना कधी झाली?
G20 हा जगातील 20 देशांनी मिळून बनवलेला एक शक्तिशाली गट आहे. याची स्थापना 1999 साली झाली. याची स्थापना मजबूत अर्थव्यवस्था असलेल्या देशांनी परस्पर सहकार्यासाठी केली होती. भारताबरोबरच चीन, अमेरिका, रशिया, जर्मनी, जपान, ब्रिटन, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, तुर्की, मेक्सिको, दक्षिण कोरिया, युरोपियन युनियन आणि अर्जेंटिना या देशांचा या गटात समावेश आहे.
advertisement
2. G20 समिट बनण्याचा उद्देश काय होता?
1999 च्या आधी काही वर्षांपासून आशिया खंडातील देश आर्थिक संकटाचा सामना करत होते, त्या पार्श्वभूमीवर जर्मनीमध्ये G8 देशांची बैठक झाली आणि G20 ची स्थापना झाली. यामध्ये मजबूत अर्थव्यवस्था असलेल्या सर्व 20 देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँक गव्हर्नरना बोलावण्यात आले होते. जागतिक आर्थिक समस्यांवर परस्पर चर्चा करून तोडगा काढणं हा या संघटनेचा उद्देश होता. 2008 च्या जागतिक मंदीनंतर सर्व देशांचे राष्ट्राध्यक्षही या बैठकीत सहभागी होतील, असा निर्णय घेण्यात आला होता.
advertisement
3. जगात G20 चे महत्त्व काय आहे?
G20 च्या ताकदीचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की त्याच्या सदस्य देशांकडे एकत्रितपणे जगाच्या GDP च्या 80 टक्के, लोकसंख्येच्या 60 टक्के आणि जागतिक व्यापारात 75 टक्के वाटा आहे. अशा परिस्थितीत या परिषदेत घेतलेल्या निर्णयाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो.
4. G20 ला कोणते वैधानिक अधिकार आहेत?
advertisement
युनायटेड नेशन्सच्या धर्तीवर G20 ला कोणतेही वैधानिक अधिकार नाहीत. या परिषदेत घेतलेले निर्णय मान्य करण्याचे कोणतेही कायदेशीर बंधन नाही. हा आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली देशांचा समूह आहे. इथे घेतलेल्या निर्णयांमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.
5. G20 चा सामान्य लोकांना काय फायदा?
आपण G20 बद्दल इतकं बोलतोय तर भारताला G20 चे सदस्यत्व असल्याने काय फायदा होईल, हा प्रश्न पडणारच. हे सोप्या शब्दात समजून घेऊयात. G20 बैठकीदरम्यान जगातील अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर आणि तिला प्रोत्साहन देण्यावर चर्चा होते. आर्थिक मजबुतीमुळे देशांमध्ये रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतात. इथे शिक्षण, अन्नधान्याच्या किमती नियंत्रित करणं, रोजगार अशा मुद्द्यांवर चर्चा करून निर्णय घेतले जातात.
advertisement
6. G20 चे अध्यक्ष कसे निवडले जातात?
G20 च्या अध्यक्षांचा निर्णय ट्रोइकाने घेतला जातो. प्रत्येक परिषद भूतकाळातील, वर्तमान आणि भविष्यातील राष्ट्राध्यक्षांच्या पाठिंब्याने आयोजित केली जाते. त्याच्या गटाला ट्रोइका म्हणतात. या वेळी ट्रोइकामध्ये इंडोनेशिया, भारत आणि ब्राझील यांचा समावेश आहे. सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास भारताला इंडोनेशियाकडून G20 चे अध्यक्षपद मिळाले आणि आता ब्राझील पुढील वर्षी अध्यक्षपद भूषवणार आहे.
advertisement
7. G20 कसं काम करतं?
G20 मध्ये एकूण दोन ट्रॅक आहेत. पहिला आर्थिक ट्रॅक आणि दुसरा शेरपा ट्रॅक. आर्थिक ट्रॅकमध्ये सदस्य देशांचे अर्थमंत्री आणि सेंट्रल बँकेचे गव्हर्नर महत्त्वाची भूमिका बजावतात. शेरपा ट्रॅकमध्ये शेरपा हा शब्द नेपाळी भाषेतून घेतला आहे. शेरपा यांना गाइड म्हणतात. शेरपा G20 मधील सदस्य नेत्यांसाठी गाइड म्हणून काम करतात. शेरपा ट्रॅकमध्ये नेत्यांच्या शेरपांची चर्चा केली जाते, ज्यामुळे मुख्य सभेदरम्यान मुद्द्यांवर चर्चा करणं सोपं होतं.
advertisement
8. आतापर्यंत किती G20 बैठका झाल्या आहेत?
G20 च्या स्थापनेला 24 वर्षं झाली असली तरी दरवर्षी G20 ची बैठक व्हायलाच हवी असे नाही. दोन दशकांहून अधिक काळात एकूण 17 वेळा G20 बैठका झाल्या आहेत. G20 शिखर परिषद आयोजित करण्याची ही 18वी वेळ आहे.
9. परिषदेत G20 चा भाग नसलेले किती देश येतील?
G20 शिखर परिषदेदरम्यान केवळ ग्रुपचे सदस्य देशच यात सहभागी होत नाहीत, तर त्यात सहभागी नसलेल्या देशांनाही आमंत्रित केले जाते. भारताने नऊ देशांना G20 मध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे, ज्यात बांगलादेश, इजिप्त, यूएई, नेदरलँड्स, मॉरिशस, नायजेरिया, ओमान, सिंगापूर आणि स्पेन यांचा समावेश आहे.
10. G20 चे मुख्यालय कुठे आहे?
G20 ग्रुपचं कोणतंही मुख्यालय किंवा सचिवालय नाही. कायमस्वरूपी कर्मचार्यांशिवाय G20 आयोजन केली जाते. सर्व 20 सदस्य देशांमध्ये दरवर्षी रोटेशनची एक प्रणाली आहे, ज्याद्वारे नवीन अध्यक्ष निवडला जातो. जो देश परिषदेचा अध्यक्ष होतो तो G20 बैठका आयोजित करण्याची जबाबदारी पार पाडतो.
view commentsLocation :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
September 07, 2023 3:48 PM IST


