Tamilnadu Rain : पावसाचा हाहाकार! अनेक भागात साचलं पाणी, तामिळनाडुत शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
आयएमडीने दिलेल्या इशाऱ्यानुसार, १८ डिसेंबरला तामिळनाडुतील कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थूथुकुडी, रामनाथपुरम, पुदुकोट्टई आणि तंजावुर जिल्ह्यात मुसधळार पावसाची शक्यता आहे.
कन्याकुमारी, 18 डिसेंबर : तामिळनाडुतील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी पाणीही साचलं असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. तामिळनाडु सरकारने पावसामुळे तिरुनेलवेली, थूथुकुडी, कन्याकुमारी आणि तेनकासी जिल्ह्यांमध्ये शाळा, कॉलेज अन् संस्थांना सुट्टी जाहीर केलीय. थूथुकुडीत पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं आहे. कोविलपट्टी क्षेत्रात ४० सरोवर पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
आयएमडीने दिलेल्या इशाऱ्यानुसार, १८ डिसेंबरला तामिळनाडुतील कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थूथुकुडी, रामनाथपुरम, पुदुकोट्टई आणि तंजावुर जिल्ह्यात मुसधळार पावसाची शक्यता आहे. तर १९ डिसेंबरला काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. १९ डिसेंबरला तामिळनाडु, पुदुचेरी आणि कराईकलमध्ये काही भागात वादळी वारे आणि वीजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.
advertisement
थूथुकुडी जिल्ह्यात काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. कूसलीपट्टी आणि इनाम मनियाची भागात पावसामुळे पाणी नदीपात्रातून बाहेर पडले. पाणी रोखण्यासाठी वाळूने भरलेली पोती आणि जेसीबी मशिनचा वापर केला गेला. अवकाळी सुरु असलेल्या या मुसळधार पावसामुळे तामिळनाडुत जनजीवन विस्कळीत झाले आहे.
#WATCH | Tamil Nadu: Flood affected people of Tirunelveli district, moved to shelter camp (17/12)
Heavy rain continues to batter several parts of Tamil Nadu pic.twitter.com/uzCAaLx77B
— ANI (@ANI) December 17, 2023
advertisement
नागरिकांच्या सुरक्षेसाठी खबरदारीची पावले उचलली जात आहेत. तामिळनाडुचे मंत्री केकेएसएसआर रामचंद्रन यांनी सांगितलं की, जिल्ह्यांसाठी मंत्री आणि दोन आयएएस अधिकाऱ्यांची अतिरिक्त नियुक्ती करण्यात आली आहे. पावसामुळे बाधित भागांमध्ये आवश्यक ती खबरदारी आणि उपाययोजनांवर ते लक्ष ठेवून आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 18, 2023 7:51 AM IST
मराठी बातम्या/देश/
Tamilnadu Rain : पावसाचा हाहाकार! अनेक भागात साचलं पाणी, तामिळनाडुत शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर