मुव्ही पाहून पती करायचा किळसवाणं कृत्य, एका रात्री सरिताचा संयम सुटला, बेडवरच केला कोल्ड ब्लडेड मर्डर!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
पतीच्या सततच्या जाचाला कंटाळून पत्नीने त्याचा निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पतीच्या सततच्या जाचाला कंटाळून पत्नीने त्याचा निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने पतीचं गुप्तांग दाबून त्याची हत्या केली आहे. महिलेने पोलीस चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे केले आहेत, ज्यामुळे पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. याप्रकरणी आरोपी सरिता हिला अटक केली असून तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सरिताचा जन्म 1994 मध्ये सोनीपतच्या थारू गावात झाला. 2012 मध्ये तिचे लग्न आठ वर्ष मोठ्या राम किशनशी झाले होते. वयाच्या फरकामुळे, राम किशन नेहमीच त्यांच्या नात्याबद्दल चिंतेत असायचा. सरिता त्याला सोडून जाईल या भीतीने तो सतत इतर पुरुषांशी बोलण्यापासून रोखत असे. तिला नियंत्रित करण्यासाठी तो शारीरिक हिंसाचारही करत असे. शिवाय, तो अनेकदा रात्रीच्या वेळी सरितावर अत्याचार करायचा.
advertisement
दारूच्या नशेत जबरदस्तीने संबंध
5 आणि 6 डिसेंबरच्या रात्रीही अशीच एक घटना घडली. राम किशन आणि सरितामध्ये कडाक्याचे भांडण झाले. मात्र, त्यानंतर राम किशन दारूच्या नशेत गेला आणि त्याने सरितासोबत लैंगिक संबंध ठेवले. त्याने लैंगिक संबंधादरम्यान सरितावर हल्ला केला.
सरिताने मग राम किशनपासून सुटका करून घेण्याचा निर्णय घेतला. आपला पती हा कायमच गांजाच्या नशेत असल्याचं सरिताने पोलिसांना सांगितलं. तसंच रामकिशन अनेकदा अश्लिल चित्रपट पाहून आपल्याला त्याप्रकारे लैंगिक संबंध ठेवायला भाग पाडायचा. कंटाळून मी आणि माझ्या प्रियकराने रामकिशनला संपवण्याचा कट रचला, असं सरिता तिच्या जबाबात म्हणाली आहे.
advertisement
बॉयफ्रेंडच्या मदतीने काटा काढला
सोमवारी रात्री रामकिशन झोपल्यानंतर सरिताने सतपालला फोन केला. सतपालने उशीने राम किशनचा गळा दाबला, तर सरिताने त्याचे गुप्तांग दाबले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सरिता आणि तिचा कथित प्रियकर सतपाल यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सतपालला मात्र अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
रामकिशन, सरिता आणि सतपाल या तिघांचेही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. रामकिशनवर चोरी आणि ड्रग्जच्या गैरवापराचे गुन्हे दाखल आहेत. तर सरितावर खंडणीचा आरोप आहे. रामकिशन आणि सतपाल हे दोघेही जेलमध्ये जाऊन आले आहेत, तिथेच त्यांची भेट ढाली. सतपाल 2 महिन्यांपूर्वी जेलमधून बाहेर आला, तेव्हा त्याला घ्यायला रामकिशन आला होता. रामकिशन सतपालला घेऊन त्याच्या घरी गेला, यानंतर सतपाल आणि सरिताची जवळीक वाढली. इकडे रामकिशनच्या मारहाणीमुळे सरिता आधीच त्रासली होती, त्यातच ती सतपालच्या जवळ गेली. यानंतर दोघांनीही रामकिशनचा काटा काढला.
view commentsLocation :
Sonipat,Haryana
First Published :
Jan 09, 2026 7:31 PM IST
मराठी बातम्या/देश/
मुव्ही पाहून पती करायचा किळसवाणं कृत्य, एका रात्री सरिताचा संयम सुटला, बेडवरच केला कोल्ड ब्लडेड मर्डर!









