2 अधिकाऱ्यांच्या युनिफॉर्मवर एकसारखं अशोक चिन्ह, मात्र तरीही रँकमध्ये फरक; जाणून घ्या आर्मीचं रँकिंग स्ट्रक्चर

Last Updated:

या ठिकाणी भारतीय लष्कराच्या संपूर्ण रँकिंग रचनेची माहिती देण्यात आली आहे.

News18
News18
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : तुमच्यासमोर गणवेशात उभ्या असलेल्या भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्याला तुम्ही त्याच्या खांद्यावरील चिन्हावरून (तारे) ओळखू शकता. असं देखील होऊ शकतं की, दोन अधिकाऱ्यांच्या खांद्यांवर समान चिन्हे दिसल्यानंतर तुम्ही त्यांना एकाच रँकचे अधिकारी मानू शकता. लष्करी अधिकाऱ्याच्या गणवेशात चिन्हासोबतच शोल्डर फ्लॅपवर लावलेल्या रिबीनलाही खूप महत्त्व असतं.
गणवेशावर समान चिन्हं असूनही, सैनिकाच्या शोल्डर फ्लॅपवरील एक रिबीन लष्करी अधिकाऱ्याचा दर्जा दर्शवते. उदाहरणार्थ, आपण आर्मी मेजर आणि सुभेदार मेजर या पदांचं उदाहरण घेऊया. या दोन्ही पदांच्या अधिकार्‍यांच्या शोल्डर फ्लॅपमध्ये अशोक स्तंभ असतो. पण, सुभेदार मेजरच्या शोल्डर फ्लॅपमध्ये अशोक स्तंभासोबत रिबीनही असते. हीच रिबीन दोन्ही अधिकाऱ्यांच्या पदाच्या क्रमवारीचा आधार बनते. या ठिकाणी भारतीय लष्कराच्या संपूर्ण रँकिंग रचनेची माहिती देण्यात आली आहे.
advertisement
भारतीय लष्कराचं रँकिंग स्‍ट्रक्‍चर
भारतीय लष्कराची रँकिंग संरचना तीन भागांत विभागली गेली आहे. ऑफिसर्स रँक, ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर्स आणि नॉन कमिशन्ड ऑफिसर्स असे तीन प्रकार आहेत. भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून करिअरची सुरुवात लेफ्टनंट पदापासून होते. लेफ्टनंटच्या शोल्डर फ्लॅपवर चिन्ह म्हणून दोन तारे परिधान असतात. लेफ्टनंट पदावरून बढती मिळालेले अधिकारी कॅप्टन बनतात. कॅप्टनच्या शोल्डर फ्लॅपवर चिन्ह म्हणून तीन तारे असतात.
advertisement
कॅप्टननंतर पुढील वरिष्ठ रँक 'मेजर' असते. मेजरच्या गणवेशात खांद्यावर अशोक चिन्ह असतं. मेजरनंतर पुढील पोस्ट लेफ्टनंट कर्नलची असते. लेफ्टनंट कर्नलच्या गणवेशावर अशोक चिन्ह आणि तारा असतो. लेफ्टनंट कर्नल यांना कर्नल पदावर बढती दिली जाते. कर्नलच्या गणवेशावर अशोक चिन्ह आणि दोन तारे असतात. कर्नलनंतरचं पुढचं पद म्हणजे ब्रिगेडियर. ब्रिगेडियरच्या गणवेशावर अशोक चिन्ह आणि तीन लहान तारे असतात.
advertisement
यानंतर मेजर जनरल पदाचा क्रमांक येतो. त्यांच्या गणवेशात तलवार-छडी तिरक्या स्थितीत असतात आणि त्यांच्यासोबत एक तारा असतो. मेजर जनरलना लेफ्टनंट जनरल पदावर बढती दिली जाते. या पोस्टवर आल्यानंतर गणवेशावर तलवार आणि छडी तिरक्या स्थितीत व त्यासोबत अशोक चिन्ह देखील असतं. यानंतर आर्मी जनरलपदाचा क्रमांक येतो. या अधिकाऱ्याच्या गणवेशावर अशोक चिन्ह, एक तारा आणि एक तिरकी तलवार-छडी असते.
advertisement
ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर्स(जेसीओ)
जेसीओ अंतर्गत नायब सुभेदार, सुभेदार आणि सुभेदार मेजर ही पदे येतात. जेसीओची सुरुवात नायब सुभेदार पदापासून होते. त्याच्या खांद्यांवर दोन लाल आणि दोन पिवळ्या फिती असतात आणि त्यासोबत एक तारा असतो. नायब सुभेदारापेक्षा सुभेदार हे वरिष्ठ पद आहे. सुभेदार रँकमध्ये, लाल आणि पिवळ्या फितीसह दोन तारे गणवेशाला लावले जातात. सुभेदारापेक्षा वरिष्ठ पद सुभेदार मेजरचं असतं. या स्थितीत, खांद्यावर लाल बॉर्डरच्या पिवळ्या फितीसह अशोक चिन्ह असतं.
advertisement
नॉन-कमिशन्ड रँक
नॉन-कमिशन्ड रँकमध्ये प्रथम क्रमांक सैनिकाचा आहे, जो भारतीय लष्कराचा पाया आहे. सैनिक हे भारतीय सैन्यातील सर्वात सुरुवातीचं पद आहे. त्याच्या गणवेशात एक साधा शोल्डर फ्लॅप असतो. पदोन्नतीनंतर साधा सैनिक लान्स नाईक होतो. लान्स नाईकच्या गणवेशावर लाल बॉर्डर असलेली पिवळी रिबिन असते. लान्स नाईक यांची नाईक म्हणून बढती झाली की त्यांच्या गणवेशात लाल बॉर्डर असलेल्या दोन पिवळ्या रिबिन येतात.
advertisement
नायक यांच्यानंतर पुढील वरिष्ठ पद म्हणजे हवालदार. हवालदाराच्या गणवेशाला लाल बॉर्डर असलेल्या तीन पिवळ्या रिबीन असतात. यानंतर कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार म्हणून बढती मिळते. या पोस्टच्या गणवेशात लाल बॉर्डर असलेल्या तीन पिवळ्या रिबीनसह अशोक चिन्ह देखील असतं.अँतर

मराठी बातम्या/देश/
2 अधिकाऱ्यांच्या युनिफॉर्मवर एकसारखं अशोक चिन्ह, मात्र तरीही रँकमध्ये फरक; जाणून घ्या आर्मीचं रँकिंग स्ट्रक्चर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement