Delhi : शरद पवार यांच्या निवासस्थानी 'इंडिया'ची बैठक, लोकसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार?
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
विरोधकांची आघाडी इंडियाच्या समन्वय समितीची पहिली बैठक दिल्लीत होणार आहे. आज सायंकाळी चार वाजता ही बैठक सुरू होणार आहे.
दिल्ली, 13 सप्टेंबर : विरोधकांची आघाडी इंडियाच्या समन्वय समितीची पहिली बैठक दिल्लीत होणार आहे. आज सायंकाळी चार वाजता ही बैठक सुरू होणार आहे. या बैठकीत जागा वापटाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा होणार असल्याचंही म्हटलं जातंय. विरोधकांच्या आघाडीतील सर्व घटक पक्षांमध्ये राज्यातील वाटाघाटीसाठी वेळ ठरवली जाऊ शकते. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीच्या योजना आखण्यासाठी यामुळे मदत होईल. समन्वय समितीची बैठक नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी होणार आहे.
जागा वाटपाचा फॉर्म्युला हा गेल्या निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीच्या आधारावर असेल. तसंच राज्यांमध्ये पक्षाची ताकद किती यानुसार जागा वाटप ठरेल अशी माहिती एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलीय. याआधी इंडिया आघाडीकडून सांगण्यात आलं होतं की, वेगवेगळ्या राज्यात जागा वाटपाची व्यवस्था लगेच सुरू केली जाईल. लवकरच एकमेकांच्या सहकार्याने ती पूर्ण होईल.
advertisement
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, नीतीश कुमार यांच्यासोबत राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी मुंबईतील बैठकीवेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाच्या चर्चेसाठी दबाव टाकला होता असं सांगितलं जातंय. एप्रिल-मे महिन्यात लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टीने तयारीसाठी वेळ मिळावा आणि रणनिती आखता यावी यासाठी हालचाली सुरू केल्या असल्याचं सांगण्यात येतंय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 13, 2023 8:16 AM IST
मराठी बातम्या/देश/
Delhi : शरद पवार यांच्या निवासस्थानी 'इंडिया'ची बैठक, लोकसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार?