Lagrange Point 1 : हे ते ठिकाण जिथं जाणार भारताचं सूर्ययान Aditya L1; इथं सूर्याची आगही काहीच करू शकत नाही

Last Updated:

भारताचं सूर्ययान या ठिकाणी राहून करणार सूर्याचा अभ्यास.

सूर्ययान
सूर्ययान
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्रो'ने पाठवलेल्या चांद्रयान-3ने नुकतंच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवलं. त्यामुळे अशी कामगिरी करणारा भारत हा जगातला पहिला, चंद्रावर उतरणारा भारत हा जगातला चौथा देश बनला आहे. चांद्रयानाने पुढचं कार्यही अपेक्षेनुसार सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर भारताचं जगभर कौतुक होत आहे. चांद्रयान-3 यशस्वीरीत्या चंद्रावर उतरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात सौरमोहिमेबद्दल सूतोवाच केलं होतं. 'इस्रो'ची ती महत्त्वाकांक्षी सौरमोहीम सुरू करण्यासाठी येत्या 2 सप्टेंबरची तारीख निश्चित करण्यात आली आहे. आदित्य - एल वन असं त्या मोहिमेचं नाव आहे. त्या मोहिमेविषयी अधिक जाणून घेऊ या.
आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून पीएसएलव्ही सी-57 रॉकेटच्या साह्याने दोन सप्टेंबर 2023 रोजी आदित्य एल वन ऑब्झर्व्हेटरी प्रक्षेपित केली जाणार आहे. ही ऑब्झर्व्हेटरी लॅगरेंज पॉइंट वन (एल वन) (Lagrange Point 1) या बिंदूवर पाठवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. एल वन हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधला एक विशिष्ट बिंदू असून, तिथून सूर्याचा अभ्यास कोणत्याही अडथळ्याविना करणं शक्य आहे. या मोहिमेसाठी इस्रो 400 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करणार आहे. अत्यंत कमी खर्चात मोहिमा यशस्वी करण्यात इस्रो माहीर आहे. त्यामुळे हा खर्चही कमीच असेल; पण त्या विशिष्ट बिंदूवर जाणं इतकं महत्त्वाचं का आहे, हे जाणून घेऊ या.
advertisement
आपल्या सौरमालेत असे अनेक बिंदू आहेत, जिथे सूर्याचं गुरुत्वाकर्षण आणि ग्रहाचं गुरुत्वाकर्षण एकसमान असतं. अशा बिंदूंना लॅगरेंज पॉइंट्स असं म्हटलं जातं. असे पाच बिंदू असतात. अशा बिंदूवर आदित्य ही ऑब्झर्व्हेटरी पाठवण्याचं कारण म्हणजे तिथे आकर्षण आणि प्रत्याकर्षण या दोन्ही घटना घडत असल्याने छोट्या उपग्रहांसारखे घटक अंतराळात आहेत त्याच ठिकाणी राहू शकतात आणि एखाद्या अनस्पेसिफिक पॉइंटभोवती फिरत राहतात. या बिंदूवर राहिल्यास यानाला आपली स्थिती कायम राखण्यासाठी आवश्यक असलेलं इंधन कमी लागेल.
advertisement
लॅगरेज पॉइंट 1 हा बिंदू सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर्स अंतरावर असून, थेट सूर्याच्या समोर आहे आणि पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या कक्षेच्या बरोबरीने आहे. सूर्य-पृथ्वी या सिस्टीममध्ये एल-वन या बिंदूला स्थिरता आहे. त्यामुळे अंतराळाच्या अभ्यासासाठी तो चांगला बिंदू आहे.
advertisement
सोलार अँड हेलिओस्फेरिक ऑब्झर्व्हेटरी एल-वनच्या जवळ मुद्दामहून पाठवण्यात आलेली आहे, हे एक उदाहरण घेता येईल. या बिंदूवर आदित्ययान गेल्यास त्या यानाकडून होणार असलेल्या सूर्याच्या निरीक्षणात पृथ्वीचा कोणताही अडथळा येणार नाही किंवा रात्र-दिवसाचं चक्रही तिथे असणार नाही. तसंच ग्रहणही तिथे नसेल. त्यामुळे सूर्याचं सातत्यपूर्ण निरीक्षण करता येईल. सूर्यावरच्या विविध घटना, तसंच, त्यांचे विविध ग्रहांवर, वातावरणावर होणारे परिणाम अभ्यासता येणार आहेत.
advertisement
आदित्य एल-वनमध्ये एकूण सात पेलोड्स अर्थात सात उपकरणं असतील. सातपैकी चार पेलोड्स सूर्यावर नजर ठेवतील. सूर्याच्या फोटोस्फिअर, क्रोमोस्फिअर आणि सर्वांत बाहेरच्या कोरोना या थरांचा अभ्यास करतील. तीन पेलोड्स परिस्थितीनुसार कण आणि मॅग्नेटिक फिल्डचा अभ्यास करतील.
'व्हिजिबल इमिशन लाइन कोरोनाग्राफ पेलोड' इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (आयआयए) या संस्थेने विकसित केलं आहे. तसंच, सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजर पेलोड आणि इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (आयुका, पुणे) या संस्थेने विकसित केलं आहे.
advertisement
'इस्रो'ने दिलेल्या माहितीनुसार, 'आदित्य एल वन मोहिमेतल्या पेलोड्सच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची माहिती हाती लागणार आहे. सूर्याच्या बाह्य वातावरणात उष्णता कशी वाढते, त्यातून काय बाहेर पडतं, ज्वाळा तयार होण्यापूर्वी आणि नंतर नेमकं काय घडत असतं, अंतराळातल्या हवामानात बदल कला होतो, इत्यादी अनेक प्रकारच्या माहितीचा त्यात समावेश आहे.'
advertisement
सूर्याच्या कोरोना आणि क्रोमोस्फिअर या भागांमधली निरीक्षणं यूव्ही पेलोडच्या साह्याने नोंदवली जातील. तसंच, ज्वाळांची निरीक्षणं एक्स रे पेलोडच्या साह्याने नोंदवली जातील. एल वन भोवतीच्या हॅलो कक्षेत पोहोचणारे भारित कण आणि मॅग्नेटिक फिल्डबद्दलची माहिती पार्टिकल डिटेक्टर्स आणि मॅग्नेटोमीटर देऊ शकतील.
'या साऱ्यामुळे सूर्यावर चाललेल्या घटना-घडामोडींची निरीक्षणं नोंदवता येतील आणि त्याचा अंतराळातल्या वातावरणावर होणारा परिणाम रिअल टाइममध्ये अभ्यासता येणार आहे,' असं 'इस्रो'ने म्हटलं आहे.
मराठी बातम्या/देश/
Lagrange Point 1 : हे ते ठिकाण जिथं जाणार भारताचं सूर्ययान Aditya L1; इथं सूर्याची आगही काहीच करू शकत नाही
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement