चंद्र, सुर्यानंतर आता कोणत्या ग्रहावर जाणार भारत? पुढील मिशनसाठी ISRO ची तयारी सुरू

Last Updated:

भारताच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान 3 च्या माध्यमातून चंद्रावर यशस्वीरित्या पाऊल ठेवलं. त्यानंतर त्यांनी सूर्याकडे आपला मोर्चा वळवला आणि ‘आदित्य एल-1’ हे यान सूर्याच्या दिशेने पाठवलं.

ISRO प्रमुख एस सोमनाथ
ISRO प्रमुख एस सोमनाथ
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : भारताच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान 3 च्या माध्यमातून चंद्रावर यशस्वीरित्या पाऊल ठेवलं. त्यानंतर त्यांनी सूर्याकडे आपला मोर्चा वळवला आणि ‘आदित्य एल-1’ हे यान सूर्याच्या दिशेने पाठवलं. सूर्य व चंद्र अभ्यास मोहीम यशस्वीरित्या राबवल्यानंतर आता इस्रो सूर्यमालेतील इतर ग्रहांचा अभ्यास करण्याचा विचार करत आहे. त्यानुसार लवकरच शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी मिशन सुरू केलं जाईल, जेणेकरून या विश्वातील आणखी रहस्यं उलगडता येतील. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी या बद्दल माहिती दिली आहे.
काय आहे इस्रोची योजना?
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने ताऱ्यांचे रहस्य उलगडण्यासाठी एक योजना बनवली आहे. या ताऱ्यांवर पर्यावरण असल्याचं म्हटलं जातं. हे तारे आपल्या सूर्यमालेच्या बाहेर आहेत. इस्रो प्रमुख सोमनाथ यांनी मंगळवारी याबद्दल माहिती दिली.
शुक्र मिशन लवकरच होणार लाँच
भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकॅडमीच्या एका कार्यक्रमात सोमनाथ म्हणाले की, इस्रो शुक्र ग्रहाच्या अभ्यासासाठी एक मिशन सुरू करणार आहे. अंतराळातील वातावरण तसंच पृथ्वीवर त्याचा प्रभाव याचा अभ्यास करण्यासाठी दोन उपग्रह पाठवण्याची योजना आखत आहे.
advertisement
काय म्हणाले एस. सोमनाथ?
एस. सोमनाथ म्हणाले की एक्सपोसॅट किंवा एक्स रे पोलरीमीटर सॅटेलाइट या वर्षी डिसेंबरमध्ये प्रक्षेपणासाठी सज्ज आहेत, ही सॅटेलाईट्स नष्ट होण्याच्या प्रक्रियेत असलेल्या ताऱ्यांचा अभ्यास करतील. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार इस्रो एक्सोवर्ल्ड्स नावाच्या एका उपग्रहाचा विचार करत आहे, जो सूर्यमालेच्या बाहेरील ग्रह आणि ताऱ्यांभोवती फिरत असलेल्या ग्रहांचा अभ्यास करेल.
advertisement
मिशन मंगळ होणार लाँच
एस. सोमनाथ यांनी या वेळी मिशन मंगळबाबतही वक्तव्य केलं. ते म्हणाले की सूर्यमालेच्या बाहेर जवळपास 5 हजारांहून अधिक ग्रह आहेत. ज्यांच्यापैकी किमान 100 ग्रहांवर पर्यावरण असल्याचं म्हटलं जात आहे. मंगळ ग्रहावरही एक अंतराळयान पाठवण्यासाठी योजना सुरू आहे.
दरम्यान, भारतात रॉकेटच्या निर्मितीमध्ये वापरण्यात येणारे सुमारे 95 टक्के घटक हे देशांतील स्त्रोतांकडून मिळवले जातात. रॉकेट आणि उपग्रहांच्या विकासासह सर्व तांत्रिक कामं देशातच केली जातात. स्वदेशीकरण, तंत्रज्ञान क्षमता आणि संशोधनावर लक्ष केंद्रित करणाऱ्या राष्ट्रीय प्रयोगशाळा, संरक्षण प्रयोगशाळा आणि CSIR प्रयोगशाळांसह विविध भारतीय प्रयोगशाळांच्या सहकार्याचे हे यश आहे, असंही या वेळी सोमनाथ यांनी सांगितलं.
advertisement

मराठी बातम्या/देश/
चंद्र, सुर्यानंतर आता कोणत्या ग्रहावर जाणार भारत? पुढील मिशनसाठी ISRO ची तयारी सुरू
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement