advertisement

हातपाय बांधले, तोंडात बोळा कोंबला, MBA च्या विद्यार्थिनीसोबत अडीच तास करत राहिला अत्याचार, मृतदेहासोबतही....

Last Updated:

इंदोर येथील द्वारकापुरी येथील एमबीए विद्यार्थिनीच्या खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी पीयूष धामनोदियाने धक्कादायक खुलासे केले.

News18
News18
इंदोर येथील द्वारकापुरी येथील एमबीए विद्यार्थिनीच्या खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी पीयूष धामनोदियाने धक्कादायक खुलासे केले. हत्येनंतरही पीयूष विद्यार्थिनीवर क्रूरपणे अत्याचार करत राहिला. आरोपीनं आधीच तिला मारण्याचा प्लॅन केला होता. भांडण झाल्यास तिचा गळा आवळण्यासाठी त्याने दोरी खरेदी केली होती. चौकशीदरम्यान, घटनेपूर्वी आरोपीने विद्यार्थिनीचे हातपाय बांधले आणि तिच्या तोंडात बोळा कोंबून अत्याचार केल्याचं उघड झालं आहे.
अत्याचार करून आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तिचा गळा दाबून खून केला. तसेच तिच्या छातीत चाकुने वार केले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हत्येनंतर आरोपीने दारू आणली. दारु प्यायल्यानंतर त्याने पुन्हा विद्यार्थिनीच्या मृतदेहावर अत्याचार केले. या घटनेचा जबाब नोंदवत असताना एका महिला एसआयच्या देखील डोळ्यात पाणी आलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
advertisement
पीयूष अडीच तास विद्यार्थिनीसोबत खोलीत होता
सोमवारी पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तपासात असे दिसून आले की आरोपी १० फेब्रुवारी रोजी अडीच तास खोलीत होता. तो विद्यार्थिनीसोबत रुममध्ये जाताना दिसत आहे. तसेच खून केल्यानंतर एक बॅग घेऊन तो निघून जाताना देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. आरोपीनं तब्बल अडीच तास विद्यार्थिनीवर कसे अत्याचार केले? याची माहिती आरोपीनं स्वत: दिली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी १० फेब्रुवारी रोजी पीडित विद्यार्थिनी आजारी होती. त्यामुळे तिने आरोपीसोबत शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला होता. मात्र केवळ बोलायचं असल्याचं सांगत आरोपी पीडितेला घेऊन आपल्या रुमवर गेला. इथं त्याने पीडितेवर अत्याचार करून तिची हत्या केली. पीडित तरुणी सोशल मीडियावर एका तरुणाशी बोलत होती. यामुळे ती आपल्याला धोका देतेय, असं आरोपीला संशय होता. याच संशयातून आरोपीनं तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/देश/
हातपाय बांधले, तोंडात बोळा कोंबला, MBA च्या विद्यार्थिनीसोबत अडीच तास करत राहिला अत्याचार, मृतदेहासोबतही....
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement