ब्युटी क्वीन पत्नी, हॅन्डसम पती अन् हॉट बॉयफ्रेंड... छतावर सापडली डेडबॉडी, NRI लव्ह ट्राएंगलचा खतरनाक शेवट!

Last Updated:

कॅनडामधून परतलेल्या एनआरआय पत्नीला बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

ब्युटी क्वीन पत्नी, हॅन्डसम पती अन् हॉट बॉयफ्रेंड... छतावर सापडली डेडबॉडी, NRI लव्ह ट्राएंगलचा खतरनाक शेवट!
ब्युटी क्वीन पत्नी, हॅन्डसम पती अन् हॉट बॉयफ्रेंड... छतावर सापडली डेडबॉडी, NRI लव्ह ट्राएंगलचा खतरनाक शेवट!
रुपिंदर कौर नावाच्या विवाहित महिलेला कॅनडामधून हद्दपार करण्यात आलं, त्यानंतर ती भारतात परतली. दिसायला सुंदर असलेल्या रुपिंदर कौरची भेट हरकमलप्रीत सिंग नावाच्या तरुण आणि देखण्या पुरुषासोबत झाली. या दोघांमध्ये ऑनलाइन चॅटिंग सुरू झाले आणि हळूहळू त्यांच्यात नातं प्रस्थापित झालं, पण त्यानंतर घडलेल्या घटनेनंतर कुटुंबात वादळ निर्माण झालं.
रुपिंदर कौरने तिच्या प्रियकरासह तिचा पती गुरविंदर सिंगची हत्या केली. चोरी आणि दरोड्याच्या उद्देशातून ही हत्या करण्यात आल्याचं सुरूवातीला भासवण्यात आलं. रात्रीच्या अंधारात, रुपिंदर कौर आणि तिचा प्रियकर हरकमलप्रीत सिंग यांनी गुरविंदर सिंगचा गळा दाबून हत्या केली आणि त्याचा मृतदेह छतावर फेकला, यानंतर रुपिंदरने आरडाओरडा सुरू केला. रुपिंदरने अनेक तास पोलीस आणि गावकऱ्यांना अंधारात ठेवले. पण एका घटनेमुळे रुपिंदरच्या कृतीवर संशय आला. रुपिंद वारंवार तिचे म्हणणे बदलत होती, ज्यामुळे पोलिसांना संशय निर्माण झाला.
advertisement
पंजाबमधील फरीदकोट जिल्ह्यातील सुखानवाला गाव 28 आणि 29 नोव्हेंबरच्या रात्री जागे राहिले. गुरविंदर सिंग त्याची पत्नी रुपिंदर कौरसोबत राहत होता. अचानक, रुपिंदर कौर घराच्या छतावर चढली आणि ओरडू लागली की तिच्या पतीला दरोडेखोरांनी मारले आहे. माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा घरात विखुरलेले सामान आणि गुरविंदर सिंगचा मृतदेह छतावर आढळला.
advertisement

पतीला समजले पत्नीचे अनैतिक संबंध

पण गुरविंदर सिंगची बहीण घटनास्थळी आली आणि तिने आपल्या भावाची हत्या झाली असून रुपिंदर आणि तिचा प्रियकर हरकमलप्रीत सिंग यांनी हा गुन्हा केल्याचा दावा केला. यानंतर पोलिसांनी रुपिंदर कौरची चौकशी सुरू केली, तेव्हा सगळं प्रकरण उघडकीस आलं. याप्रकरणी पोलिसांनी रुपिंदरला अटक केली असून तिचा प्रियकर हरकमलप्रीत सिंग फरार आहे.
advertisement

प्रियकर फरार, प्रेयसी अटकेत

रुपिंदर कौरचा प्रियकर भटिंडाच्या बलुआना गावचा रहिवासी आहे. पोलिसांनी रुपिंदर कौर आणि तिचा प्रियकर हरकमलप्रीत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एनआरआय कुटुंबातील गुरविंदर सिंगने 2023 मध्ये फरीदकोट येथील रहिवासी रुपिंदर कौरशी लग्न केले. लग्नानंतर रुपिंदर कौर कॅनडाला गेली, पण 2024 मध्ये तिला तेथून हद्दपार करण्यात आले. या काळात तिचे बलुआना येथील रहिवासी हरकमलप्रीत सिंगशी प्रेमसंबंध निर्माण झाले. हरकमलप्रीत सिंग यालाही कॅनडामधून हद्दपार करण्यात आले होते.
advertisement
मृत गुरविंदर सिंगची बहीण मनवीर कौर हिने पोलिसांना सांगितले की तिचा भाऊ रुपिंदर कौर आणि हरकमलप्रीत सिंग यांच्या नात्याबद्दल माहिती देत होता. तिच्या भावाने त्याची हत्या होण्याची भीती व्यक्त केली होती. पंजाब पोलीस आता या घटनेचा तपास करत आहेत. डीएसपी तिरलोचन सिंह यांनी सांगितले की पोलिसांनी मृताची पत्नी रुपिंदर कौर आणि तिचा प्रियकर हरकमलप्रीत सिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रुपिंदर कौरची चौकशी सुरू आहे, तर तिच्या प्रियकराचा शोध सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
ब्युटी क्वीन पत्नी, हॅन्डसम पती अन् हॉट बॉयफ्रेंड... छतावर सापडली डेडबॉडी, NRI लव्ह ट्राएंगलचा खतरनाक शेवट!
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement