हॉटेल रुमवर पत्नीला रंगेहात पकडले, पतीने केला व्हिडिओ शूट; व्हायरल Clipची देशभरात चर्चा
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Husband Caught Wife: हरियाणातील जींदमध्ये पतीने हॉटेलमध्ये पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत रंगेहात पकडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेने सोशल मीडियावर खळबळ उडाली असून, पती गंभीर मानसिक तणावात असल्याचे समोर आले आहे.
जींद (हरियाणा): हरियाणातील जींद येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीला हॉटेलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबत पकडल्याचा व्हिडिओ स्वतःच रेकॉर्ड (film) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकाराने घटनास्थळी गोंधळ झाला आणि नंतर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्याची चर्चा सुरू झाली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, राकेश नावाच्या पतीने आरोप केला आहे की- तो काही काळापासून वैयक्तिक अडचणींना तोड देत होता. त्याने आपल्या पत्नीवर अविश्वासू असल्याचा आरोप केला आणि जेव्हा त्याने याबद्दल आक्षेप घेतला, तेव्हा आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करून फसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या जोडप्याचा कौटुंबिक न्यायालयात (family court) कायदेशीर वाद आधीच सुरू आहे. त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीचा ताबा पत्नीकडे आहे.
advertisement
व्हिडिओमध्ये काय दिसले?
सुमारे दोन मिनिटांच्या या व्हिडिओची सुरुवात राकेश अत्यंत तणावात हॉटेलकडे जाताना दिसतो. तो फोन दुसऱ्या व्यक्तीकडे देत म्हणतो, माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे . त्यानंतर तो हॉटेलच्या रिसेप्शनवर रूम नंबर विचारतो. सोबत काही लोकांना घेऊन तो घाईघाईने रूमकडे धाव घेतो आणि दार जोराने वाजवण्यास सुरुवात करतो.
advertisement
वारंवार ठोठावल्यानंतर दार उघडते आणि आतमध्ये त्याची पत्नी दुसऱ्या एका पुरुषासोबत दिसते. राकेश रागाने ओरडत, लाईट चालू करण्याची मागणी करतो जेणेकरून सर्वांना त्यांचे चेहरे स्पष्ट दिसतील. तो मानसिकरित्या हादरलेला (visibly shaken) दिसत असून दोघांवरही ओरडतो.
advertisement
एका क्षणी त्याची पत्नी हात वर करण्याचा प्रयत्न करते. पण तो तिला मागे ढकलतो आणि पोलिसांना बोलावण्याची मागणी करतो. व्हिडिओच्या शेवटी, तिचा कथित प्रियकर घाईघाईने शूज घालताना दिसतो आणि आजूबाजूचे लोक त्याला जाब विचारतात.
advertisement
नंतर राकेशने प्रसारमाध्यमांना सांगितले की- पत्नीच्या या कृत्यांमुळे तो गंभीर मानसिक दडपणाखाली आहे. त्याने आरोप केला की, पत्नीचा प्रियकर शहरातील एका रुग्णालयात मेडिकल शॉप चालवतो, त्याच्या सांगण्यावरूनच राकेशविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नी को ब्वॉयफ्रेंड के साथ रंगे हाथों पकडा...बुलाई पुलिस! pic.twitter.com/IhbJJjnrLk
— aditya mishra bajirao (@bajirao107) September 24, 2025
advertisement
राकेशने आपण एकटे पडल्यासारखे आणि असहाय्य झाल्याचे सांगितले. एवढेच नाही तर या सगळ्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा विचार येत असल्याचे म्हटले.
24 सप्टेंबर रोजी 'X' वर शेअर केलेल्या या व्हिडिओला 53,000 हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी कमेंट्समध्ये आश्चर्य, सहानुभूती आणि टीका व्यक्त केली आहे. एका युजरने लिहिले, या देशाला काय झाले आहे? दुसऱ्या एका युझरने म्हटले की- पकडले गेल्यावरही तो माज दाखवत आहे... एवढा आत्मविश्वास कुठून येतो? अनेकांनी पतीबद्दल सहानुभूती व्यक्त केली आणि हे पाहणे वेदनादायक असल्याचे म्हटले. तर काहींनी दोघांवरही स्वतःची बदनामी केल्याबद्दल टीका केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 26, 2025 10:49 PM IST
मराठी बातम्या/देश/
हॉटेल रुमवर पत्नीला रंगेहात पकडले, पतीने केला व्हिडिओ शूट; व्हायरल Clipची देशभरात चर्चा