महाराष्ट्र-गुजरातचे गुन्हेगार कोटामध्ये जाऊन का लपतायत? समोर आलं धक्कादायक कारण
- Published by:Devika Shinde
Last Updated:
गेल्या दोन आठवड्यांत कोटा पोलिसांनी दोन मोठ्या प्रकरणांचा पर्दाफाश केला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमधील तब्बल 11 शातिर गुन्हेगारांना पोलिसांनी अटक करून त्यांच्या राज्यांच्या पोलिसांच्या स्वाधीन केलं.
मुंबई : भारतामध्ये मोठ्या शहरांमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याच्या बातम्या अधूनमधून समोर येतात. मात्र अलीकडेच राजस्थानातील कोटा, जे कोचिंग सिटी म्हणून प्रसिद्ध आहे, ते महाराष्ट्र आणि गुजरातच्या गुन्हेगारांसाठी सुरक्षित शरणस्थळ बनत असल्याचं उघड झालं आहे. याचा फायदा घेत या भागात गुन्हेगार वाढू लागले आहेत.
गेल्या दोन आठवड्यांत कोटा पोलिसांनी अशाच दोन मोठ्या प्रकरणांचा पर्दाफाश केला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमधील तब्बल 11 शातिर गुन्हेगारांना पोलिसांनी अटक करून त्यांच्या राज्यांच्या पोलिसांच्या स्वाधीन केलं. हे गुन्हेगार व्यापाऱ्यांचं अपहरण करून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागत होते.
कोटा शहराच्या एसपी तेजस्विनी गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील एका व्यापाऱ्याला पिस्तुलाच्या धाकाने पळवून नेलं आणि 50 लाख रुपयांची लूट केली. त्यानंतर त्याला सोडण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयांची फिरौती मागण्यात आली. हा गँग नंतर कोटा शहरात येऊन लपला होता. गुजरात पोलिसांच्या इनपुटनंतर कोट्याच्या कुन्हाडी पोलिसांनी झटपट कारवाई करत यूपी आणि गुजरातच्या 9 गुन्हेगारांना गाठलं.
advertisement
महाराष्ट्रातील आरोपींना अटक
याचप्रमाणे, गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांचं अपहरण करून कोट्यात येऊन लपलेल्या टोळीचाही पर्दाफाश करण्यात आला. या कारवाईत अमरावती जिल्ह्यातील दोन कुख्यात गुन्हेगार मोहम्मद जुनेद आणि नेहाल अहमद यांना शस्त्रांसह अटक करण्यात आली.
या आरोपींनी अपहरण केलेल्या व्यापाऱ्यांचे एका महिलेसोबत आपत्तिजनक व्हिडिओ तयार केले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपये उकळले.
advertisement
कोटा का?
तज्ज्ञांच्या मते, दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर असल्यानं गुन्हेगारांसाठी कोटा सहज उपलब्ध असं शरणस्थळ ठरत आहे. शिवाय देशभरातील हजारो विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. त्यामुळे गुन्हेगारांना असं वाटतं की गर्दीत ते सहज लपू शकतील. मात्र कोटा पोलीस प्रत्येक संशयास्पद हालचालीवर बारकाईनं लक्ष ठेवत आहेत, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 26, 2025 10:26 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
महाराष्ट्र-गुजरातचे गुन्हेगार कोटामध्ये जाऊन का लपतायत? समोर आलं धक्कादायक कारण