मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, रेलिंगमध्ये करंटची अफवा; 6 जणांचा दुर्दैवी अंत, आकडा वाढण्याची भीती

Last Updated:

Haridwar Stampede: हरिद्वारमधील प्रसिद्ध मनसा देवी मंदिरात रविवारी सकाळी दर्शनाच्या वेळी प्रचंड गर्दीमुळे भीषण चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 6 भाविकांचा मृत्यू झाला असून 35 जण गंभीर जखमी झाले आहेत.

News18
News18
हरिद्वार (उत्तराखंड) : हरिद्वारमधील प्रसिद्ध मनसा देवी मंदिरात रविवारी सकाळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आणि अचानक चेंगराचेंगरी झाली. या भीषण घटनेत आतापर्यंत सहा भाविकांचा मृत्यू झाला असून, 35 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेनंतर आपत्कालीन बचावासाठी एसडीआरएफच्या तीन टीम्स घटनास्थळी दाखल करण्यात आल्या आहेत. मंदिर परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी सांगितले की, सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
घटनेचा तपशील
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, ही चेंगराचेंगरी सकाळच्या सुमारास उसळली, जेव्हा दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. गर्दी इतकी वाढली की, काही लोक घसरले आणि पडले, त्यांच्यावर इतर भाविक चढले. त्यामुळे अनेकांना गंभीर दुखापत झाली.
advertisement
करंट लागल्याची अफवा
हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रमेंद्र डोभाल यांनी सांगितले की-प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, मंदिराच्या पायऱ्यांपासून सुमारे 100 मीटर खाली असलेल्या रेलिंगमध्ये करंट प्रवाहित असल्याची अफवा पसरली होती. ही अफवा ऐकून लोकांमध्ये भीती निर्माण झाली आणि लोक एकमेकांना चिरडत पळू लागले. यामुळे चेंगराचेंगरी झाली.
डोभाल यांनी स्पष्ट केलं की, या अफवेचं कोणतंही प्रत्यक्ष प्रमाण अद्याप सापडलेलं नाही. परंतु अफवेमुळे घडलेल्या परिस्थितीत 6 जणांचा मृत्यू झाला असून 35 जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
advertisement
शासकीय मदतीची घोषणा
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री धामी म्हणाले, हरिद्वारच्या मनसा देवी मंदिर मार्गावर झालेली ही दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. एसडीआरएफ, पोलिस, आणि स्थानिक प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचावकार्य करत आहे. मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
advertisement
पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचा शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. हरिद्वारमधील मनसा देवी मंदिर मार्गावर झालेल्या भगदडीत झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दुःख झालं आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, असे मोदींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
हरिद्वारमधील या दुर्घटनेत अनेक भाविकांचा मृत्यू झाल्याचं ऐकून मन व्यथित झालं आहे. सर्व शोकाकुल कुटुंबीयांना मी शोकसंवेदना व्यक्त करते आणि जखमी भाविक लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करते. - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
advertisement
हेल्पलाइन क्रमांक जारी
घटनेबाबत माहिती मिळवण्यासाठी उत्तराखंड सरकारने खालील हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत:
जिल्हा आपत्कालीन परिचालन केंद्र, हरिद्वार:
📞 01334-223999 / 9068197350 / 9528250926
राज्य आपत्कालीन परिचालन केंद्र, देहरादून:
📞 0135-2710334 / 2710335 / 8218867005 / 9058441404
भाविकांची आपबिती
घटनास्थळी उपस्थित एका महिला भाविकाने सांगितले, मी मंदिराच्या पायऱ्यांवर होते. अचानक गर्दी वाढली. कोणी तरी ओरडले की करंट लागला आहे आणि लोक धावायला लागले. मी खाली पडले आणि माझा हात तुटला.
advertisement
प्रशासनाची प्रतिक्रिया
गढ़वाल मंडलाचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी सांगितले की, घटनेची गंभीरतेने दखल घेण्यात आली आहे. मी स्वतः घटनास्थळी जात आहे. संपूर्ण अहवाल मिळेपर्यंत परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जाईल.
ही दुर्घटना अनेक प्रश्न उपस्थित करत असून, सण-उत्सव किंवा मोठ्या यात्रांदरम्यान धार्मिक स्थळी सुरक्षेची ठोस व्यवस्था किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. भाविकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सूचनांचं पालन करावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, रेलिंगमध्ये करंटची अफवा; 6 जणांचा दुर्दैवी अंत, आकडा वाढण्याची भीती
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement