Actor Vijay Rally LIVE: अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी, 29 जणांचा मृत्यू; भीषण गर्दीचा कहर, अनेकांचा श्वास गुदमरला
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Actor Vijay Rally News: तमिळनाडूतील करूरमध्ये अभिनेता आणि TVK प्रमुख विजय यांच्या प्रचंड सभेत भीषण चेंगराचेंगरी झाली. ज्यात श्वास गुदमरल्याने 10 जणांचा मृत्यू आणि अनेक जखमी झाले. गर्दी इतकी प्रचंड होती की एक मुलगा देखील बेपत्ता झाला आहे.
चेन्नई: तमिळनाडूमधील करूर येथे अभिनेता आणि तमिळगा वेत्री कळगम (TVK) प्रमुख विजय यांच्या प्रचंड सभेत मोठी दुर्घटना घडली. सभेदरम्यान अचानक गर्दीत भगदडसदृश परिस्थिती निर्माण झाली आणि दम घुटल्याने 29 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. गर्दी इतकी प्रचंड होती की अनेक लोक बेशुद्ध होऊन खाली कोसळले, तसेच एका मुलाचा पत्ता लागलेला नाही अशी माहिती मिळत आहे.
advertisement
या भीषण परिस्थितीत विजय यांनी तात्काळ आपले भाषण थांबवले आणि कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यांनी रुग्णवाहिकांसाठी मार्ग मोकळा करण्याचे आवाहन करून जखमींना त्वरित रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था करण्यास सांगितले.
Breaking | கரூர் நெரிசல் - முதலமைச்சர் உத்தரவு | விஜய் பரப்புரை செய்த இடத்தில் 2 பேர் மரணம் | முதலமைச்சர் ஸ்டாலின் உத்தரவால் கரூர் விரையும் அமைச்சர்கள் மா.சு, அன்பில் மகேஸ் | #TVKVijay | #Namakkal | #TVKCampaign | #Vijay | #TamilNews #News18TamilNadu pic.twitter.com/nto2qYHlzt
— News18 Tamil Nadu (@News18TamilNadu) September 27, 2025
advertisement
दुर्घटनेनंतर सभास्थळी प्रचंड अफरातफर आणि घबराट पसरली होती. मात्र पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने बचावकार्य सुरू करून जखमींना तत्काळ वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न केला.
तमिळनाडूमधील करूर येथील दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी Xवरून सांगितले की- माजी मंत्री वी. सेनथिलबालाजी, आरोग्य मंत्री मा. सुब्रमणियन आणि जिल्हा कलेक्टर यांना तात्काळ निर्देश दिले आहेत की, बेशुद्ध पडलेल्या आणि रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांना तत्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून द्यावी. तसेच तिरुचिरापल्लीचे मंत्री अन्बिल महेश यांना देखील राहत कार्यात शक्य तितकी मदत करण्याचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. मुख्यमंत्री यांनी ADGP कडेही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनाही डॉक्टर आणि पोलिसांसह सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
advertisement
#WATCH | Tamil Nadu: A large number of people attended the campaign of TVK (Tamilaga Vettri Kazhagam) chief and actor Vijay in Karur
A stampede-like situation reportedly occurred here. Several people fainted and were taken to a nearby hospital. More details are awaited.… pic.twitter.com/4f2Gyrp0v5
— ANI (@ANI) September 27, 2025
advertisement
विजयच्या सभेत प्रचंड गर्दी
तमिळगा वेत्री कळगम (TVK) चे प्रमुख विजय यांची नमक्कल आणि करूर येथील निवडणूक रॅली दरम्यान मोठी गर्दी उसळली. सभेत विजय यांनी DMK आणि AIADMK यांच्यावर थेट हल्लाबोल केला. विजय यांनी स्पष्ट केले की- त्यांच्या पक्षाचे भाजपाशी कोणतेही गठबंधन होणार नाही आणि खोट्या वचनांचा आधारही घेतला जाणार नाही. त्यांनी राज्य सरकारवर रस्ते, आरोग्य सेवा, स्वच्छ पाणी आणि सुरक्षा यासारख्या मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयशाचे आरोप केले.
advertisement
विजय यांनी पुढे सांगितले की 2026 मधील खरी स्पर्धा DMK आणि TVK यांच्यात होईल, जिथे जनतेची ताकद आणि भ्रष्ट शासन यांच्यात लढत असेल. तसेच त्यांनी दर शनिवारी राज्यभरातील विधानसभा क्षेत्रांचा दौरा करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे त्यांच्या पक्षाची उपस्थिती आणि जनसंपर्क वाढेल.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 27, 2025 8:51 PM IST
मराठी बातम्या/देश/
Actor Vijay Rally LIVE: अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी, 29 जणांचा मृत्यू; भीषण गर्दीचा कहर, अनेकांचा श्वास गुदमरला