Niti Ayog Meeting Update: निती आयोगच्या बैठकीतून ममतादीदी तडकाफडकी बाहेर; आतमध्ये नेमकं काय घडलं? Inside Story
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Niti Ayog Meeting Update: ममता बॅनर्जी दुपारच्या जेवणानंतर NITI आयोगाच्या बैठकीत बोलणार होत्या. मात्र, त्यांना आधी बोलण्याची संधी देऊनही त्या बैठकीतून बाहेर पडल्या.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राजधानी दिल्लीत निती आयोगाची बैठक सुरू आहे. भाजप शासित मुख्यमंत्र्यांशिवाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही या बैठकीत सहभागी झाल्या होत्या. मात्र, ममता बॅनर्जी तडकाफडकी बैठकीतून बाहेर पडल्याने खळबळ उडाली आहे. ममता बॅनर्जी दुपारच्या जेवणानंतर निती आयोगाच्या बैठकीत बोलणार होत्या. मात्र, त्यांच्या विनंतीवरून त्यांना आधी बोलण्याची संधी देण्यात आली. त्यानंतरही त्यांनी बैठक मधेच का सोडली? यावरुन तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, बैठकीतून बाहेर पडल्यानंतर ममका बॅनर्जी यांनी मीडियासमोर धक्कादायक आरोप केले आहेत.
'मुख्यमंत्र्यांचा मायक्रोफोन बंद नव्हता'
सरकारी सूत्रांनी सांगितले की, NITI आयोगाच्या 9व्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचा मायक्रोफोन बंद झाल्याचा दावा खरा नाही. त्यांची बोलण्याची वेळ संपल्याचं फक्त घड्याळ दाखवत होते. इशारा द्यायला बेलही वाजली नव्हती. अल्फाबेटनुसार (अ, ब, क या क्रमाने) त्याची पाळी जेवणानंतर येणार होती. मात्र, पश्चिम बंगाल सरकारच्या अधिकृत विनंतीवरून त्यांना वरच्या क्रमांकावर बोलण्याची संधी देण्यात आली होती.
advertisement
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही टीका
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आरोपांवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रतिक्रिया दिली. सीतारामन म्हणाल्या, की ममता बॅनर्जी निती आयोगाच्या बैठकीला हजर होत्या. आम्ही सर्वांनी त्यांना ऐकलं. प्रत्येक मुख्यमंत्र्यांना विशिष्ट वेळ देण्यात आली होती. आणि हे प्रत्येक टेबलासमोर लावलेल्या स्क्रीनवर दिसतही होतं. माईक बंद केला असा त्यांनी मीडियाला सांगितलेला दावा खोटा असल्याचेही ते म्हणाले. प्रत्येक मुख्यमंत्र्यांना बोलण्यासाठी योग्य वेळ देण्यात आला होता. असं असूनही ममता बॅनर्जी यांनी केलेला दावा दुर्दैवी असल्याची टीका अर्थमंत्र्यांनी केली.
advertisement
चंद्राबाबू नायडू यांना 20 मिनिटे बोलण्याची संधी आणि मला... : ममता बॅनर्जी
निती आयोगच्या बैठकीतून तडकाफडकी बाहेर पडलेल्या ममता बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, त्यांना फक्त पाच मिनिटे बोलू देण्यात आले. उर्वरित मुख्यमंत्र्यांना 20 मिनिटे बोलण्याची परवानगी देण्यात आली होती. ‘म्हणूनच मी विरोध करत बैठकीतून बाहेर पडले. चंद्राबाबू नायडू यांना 20 मिनिटे बोलण्याची परवानगी देण्यात आली होती. मी माझ्या देशाच्या आणि राज्याच्या फायद्यासाठी मीटिंगला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला होता. पश्चिम बंगालला बजेटमध्ये काहीही मिळालेलं नाही. मी बैठकीत पश्चिम बंगालला होणाऱ्या भेदभावाबद्दल बोलू लागताच त्यांनी माझा माईक बंद केला. '
advertisement
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही या बैठकीत सहभागी झाले नाहीत. बिहारच्या वतीने, राज्याचे प्रतिनिधित्व दोन्ही उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनी बैठकीत केले. तर कर्नाटक, केरळ, तेलंगणा, तामिळनाडू, हिमाचल, पंजाब आणि दिल्ली सरकारने अर्थसंकल्पात भेदभाव केल्याचा आरोप करत NITI आयोगाच्या या बैठकीवर बहिष्कार घातला.
Location :
Delhi
First Published :
July 27, 2024 3:58 PM IST
मराठी बातम्या/देश/
Niti Ayog Meeting Update: निती आयोगच्या बैठकीतून ममतादीदी तडकाफडकी बाहेर; आतमध्ये नेमकं काय घडलं? Inside Story