Chandrayaan-3 मोहिमेचा शेवट? ‘प्रज्ञान-विक्रम’चं काय झालं? मोठी अपडेट समोर
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
अंतराळ आयोगाचे सदस्य आणि इस्रोचे माजी अध्यक्ष एएस किरण कुमार म्हणाले की, 'आता ते पुन्हा सक्रिय होण्याची आशा नाही. हे जर व्हायचंच असतं तर आत्तापर्यंत झालं असतं'.
नवी दिल्ली 07 ऑक्टोबर : चांद्रयान-3 चं लँडर 'विक्रम' आणि रोव्हर 'प्रज्ञान' पुन्हा सक्रिय होणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, एका प्रसिद्ध अवकाश शास्त्रज्ञाने शुक्रवारी भारताच्या तिसऱ्या चंद्र मोहिमेच्या संभाव्य समाप्तीचे संकेत दिले. या मोहिमेशी सक्रियपणे संबंधित असलेले अंतराळ आयोगाचे सदस्य आणि इस्रोचे माजी अध्यक्ष एएस किरण कुमार म्हणाले की, 'आता ते पुन्हा सक्रिय होण्याची आशा नाही. हे जर व्हायचंच असतं तर आत्तापर्यंत झालं असतं'.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने 22 सप्टेंबर रोजी सांगितलं होतं, की सौरऊर्जेवर चालणारं 'विक्रम' लँडर आणि 'प्रज्ञान' रोव्हर यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले गेले आहेत. जेणेकरून ते पुन्हा सक्रिय होणार का? याबाबतची खात्री करून घेता येतील. सध्या त्यांच्याकडून (लँडर आणि रोव्हर) कोणतेही सिग्नल मिळालेले नाहीत आणि संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरूच राहतील, असं त्यात म्हटलं होतं.
advertisement
चांद्रयान-3 मोहिमेसह, भारताने 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 'सॉफ्ट लँडिंग' करून इतिहास रचला आणि असं करणारा तो जगातील पहिला देश बनला. यासह, अमेरिका, तत्कालीन सोव्हिएत युनियन आणि चीननंतर चंद्रावर यशस्वी 'सॉफ्ट लँडिंग' करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. ISRO ने चंद्रावर रात्री होण्यापूर्वी 4 आणि 2 सप्टेंबर रोजी लँडर आणि रोव्हर स्लीप मोडवर टाकलं होतं. जे 22 सप्टेंबरच्या सुमारास नवीन सूर्योदयाच्या वेळी पुन्हा सक्रिय होण्याची अपेक्षा होती.
advertisement
लँडर आणि रोव्हर चंद्रावरील एका दिवसाच्या कालावधीसाठी (पृथ्वीवरील सुमारे 14 दिवस) ऑपरेट करण्यासाठी डिझाइन केलं होतं. इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 मोहिमेची तिन्ही उद्दिष्टे साध्य झाली आहेत. ज्यात चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित 'सॉफ्ट लँडिंग', चंद्रावर फिरणाऱ्या रोव्हरचे प्रात्यक्षिक आणि चंद्राच्या पृष्ठभागावर वैज्ञानिक प्रयोग यांचा समावेश आहे. चांद्रयान-3 मिशनच्या यशाबद्दल किरण कुमार म्हणाले, "आपण निश्चितपणे काय साध्य केलं आहे, तर ते म्हणजे अशा क्षेत्रात (दक्षिण ध्रुवावर) पोहोचलो आहोत जिथे कोणीही पोहोचलं नाही आणि त्या क्षेत्राचा वास्तविक डेटा कोणीही प्राप्त केला नाही. याचा फायदा पुढील मोहिमांना आणि त्या क्षेत्रात तुम्हाला करायच्या असलेल्या उपक्रमांच्या नियोजनाच्या दृष्टीने होईल. चंद्रावरून नमुने परत आणण्यासाठी मिशन सुरू करण्याच्या शक्यतेबद्दलही त्यांनी बोललं, परंतु या मोहिमेचं प्रक्षेपण करण्यासाठीची वेळ सांगितली नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 07, 2023 7:00 AM IST


