advertisement

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानची मस्ती कमी होईना, बॅलिस्टिक मिसाईलची चाचणी करून भारताला उकसावण्याचा प्रयत्न

Last Updated:

क्षेपणास्त्राची चाचणी करून पाकिस्तान भारताला युद्धासाठी प्रवृत्त करू पाहातोय.

Pakistan Missile Test-
Pakistan Missile Test-
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून भारताला युद्धासाठी चिथावणी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता पाकनं अब्दाली या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी केली. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 450 किलोमीटर इतकी आहे. अशा प्रकारे क्षेपणास्त्राची चाचणी करून पाकिस्तान भारताला युद्धासाठी प्रवृत्त करू पाहातोय. अशा प्रकारे क्षेपणास्त्र चाचणी करून पाकिस्तान तणाव आणखी वाढवत असल्याचं दिसून येतंय.
पाकिस्तानने अब्दाली बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करून भारताला एकप्रकारे चिथावणी दिली आहे. भारत आतापर्यंत संयमाने वागत आहे. पण आता याचे परिणाम आणखी वाईट असू शकतात. जर भारताने त्यांच्यावर हल्ला केला तर त्याच्याकडे काहीही उरणार नाही. पाकिस्तानच्या अब्दालीला निष्प्रभ करण्यासाठी भारताकडे अनेक क्षेपणास्त्रे आहेत. अब्दाली क्षेपणास्त्र ही एक शस्त्र प्रणाली आहे. हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. पाकिस्तानने या चाचणीला 'एक्सरसाइज सिंधू' असे नाव दिले आहे. या अब्दाली क्षेपणास्त्राच्या मारक क्षमतेबद्दल बोलायचे झाले तर ते सुमारे ४५० किलोमीटर आहे.
advertisement

अब्दालीसारखी शस्त्रे क्षणार्धात नष्ट 

पाकिस्तानने गोळीबार केला तर राजस्थान, पंजाब आणि जम्मू आणि काश्मीर सारख्या भारताच्या सीमावर्ती राज्यांना त्याचा फटका बसू शकतो. भारताकडे त्याहूनही धोकादायक आणि प्राणघातक क्षेपणास्त्रे आहेत. भारताकडे अग्नि-५ (५०००-८००० किमी रेंज) आणि के-४ एसएलबीएम (३५०० किमी रेंज) सारखी लांब मारक क्षमतेचा क्षेपणास्त्रे आहेत, जी पाकिस्तानच्या कोणत्याही भागाला लक्ष्य करू शकतात. याशिवाय, भारताची S-400 आणि स्वदेशी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली अब्दालीसारखी शस्त्रे क्षणार्धात नष्ट करू शकतात .
advertisement

दहशतवाद्यांना स्थानिकांचं पाठबळ

काश्मिरच्या पहलगाम इथं झालेल्या हल्ल्यात 26 निरपराध लोकांना दहशतवाद्यांनी ठार केलं होतं. या दहशतवाद्यांना स्थानिकांचं सहकार्य मिळाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आता माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनीही हाच संशय व्यक्त केलाय. स्थानिकांच्या पाठबळाशिवाय इतका मोठा हल्ला करणं शक्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय.
view comments
मराठी बातम्या/देश/
Pahalgam Terror Attack: पाकिस्तानची मस्ती कमी होईना, बॅलिस्टिक मिसाईलची चाचणी करून भारताला उकसावण्याचा प्रयत्न
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement