Moon Mission : चांद्रयान-3 नंतर भारत आता चंद्रावर माणूस पाठवणार, पंतप्रधानांनी सांगितलं 'टार्गेट'
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत परत आणण्याच्या प्रयोगाचा मुख्य फायदा आगामी मोहिमांचं नियोजन करताना होईल, असं इस्रोनं म्हटलं आहे.
नवी दिल्ली 07 डिसेंबर : ISRO ने चांद्रयान-3 चं प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीरित्या हस्तांतरित केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी हा भारताच्या भविष्यातील अंतराळ प्रयत्नांमधील आणखी एक मैलाचा टप्पा असल्याचं वर्णन केलं. त्यांनी X वरील पोस्टमध्ये लिहिलं की, 'इस्रोचं अभिनंदन. आपल्या उद्दिष्टांसह भविष्यातील अंतराळ प्रयत्नांमध्ये आणखी एक मैलाचा टप्पा गाठला गेला. या प्रयत्नांमध्ये 2040 पर्यंत चंद्रावर एक भारतीय पाठवण्याचं लक्ष्यही समाविष्ट आहे' .
इस्रोने मंगळवारी हे ऑपरेशन अनोखा प्रयोग असल्याचं वर्णन केलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशाजवळ सॉफ्ट लँडिंग करणं आणि 'विक्रम' लँडर आणि 'प्रज्ञान' रोव्हरवर बसवलेल्या उपकरणांचा वापर करून चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणं हे चांद्रयान-3 मोहिमेचं प्राथमिक उद्दिष्ट होतं. LVM3-M4 रॉकेट वापरून श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून 14 जुलै 2023 रोजी अंतराळयान प्रक्षेपित करण्यात आलं. चांद्रयान-3 ने 23 ऑगस्टच्या संध्याकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग केलं.
advertisement
प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत परत आणण्याच्या प्रयोगाचा मुख्य फायदा आगामी मोहिमांचं नियोजन करताना होईल, असं इस्रोनं म्हटलं आहे. विशेषत: मिशनला चंद्रावरून पृथ्वीवर परत आणण्यात. सध्या, मॉड्यूलसाठी सॉफ्टवेअर तयार केलं जात आहे, जे प्राथमिक टप्प्यात आहे. चांद्रयान-3 मिशनचं प्रोपल्शन मॉड्यूल 17 ऑगस्ट 2023 रोजी विक्रम लँडरपासून वेगळं झालं आणि ते चंद्राभोवती फिरत होतं
advertisement
पूर्वी प्रोपल्शन मॉड्युलचं आयुष्य 3 ते 6 महिने असल्याचं सांगितलं जात होतं. पण ते अजूनही अनेक वर्षे काम करू शकतं, इतकं इंधन त्यात शिल्लक आहे, असा दावा इस्रोने केला आहे. आता असं समजलं जात आहे, की शेवटी आण्विक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रोपल्शन मॉड्यूल अनेक वर्षे चंद्राभोवती फिरू शकतं. चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणाच्या वेळी प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये 1696.4 kg इंधन होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 07, 2023 10:43 AM IST
मराठी बातम्या/देश/
Moon Mission : चांद्रयान-3 नंतर भारत आता चंद्रावर माणूस पाठवणार, पंतप्रधानांनी सांगितलं 'टार्गेट'