Priyanka Gandhi Vadra: ऑपरेशन सिंदूरवरून रणकंदन, अमित शाहांनी मुंबई हल्ल्यावरून छेडलं, प्रियांका गांधींच्या उत्तराने सत्ताधारी चिडीचूप
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Priyanka Gandhi Vadra Lok Sabha Speech: शाह यांनी काँग्रेसला मुंबई दहशतवादी हल्ल्यावरून घेरण्याचा प्रयत्न केला. तर, प्रियांका गांधी यांनी दिलेल्या प्रत्युत्तरावर सत्ताधारी बाकावर शांतता दिसून आली.
नवी दिल्ली: 'ऑपरेशन सिंदूर'वरून आज लोकसभेत चर्चा सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या चर्चेच्या निमित्ताने काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार वार केला. मात्र, काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी-वाड्रा यांनी शाह यांच्यावर जोरदार पलटवार केला. शाह यांनी काँग्रेसला मुंबई दहशतवादी हल्ल्यावरून घेरण्याचा प्रयत्न केला. तर, प्रियांका गांधी यांनी दिलेल्या प्रत्युत्तरावर सत्ताधारी बाकावर शांतता दिसून आली.
काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी सांगितले की, पहलगाममध्ये हल्ला कसा आणि का झाला असा सवाल त्यांनी केला. काश्मीरमध्ये दहशतवाद संपला आहे असा प्रचार केला जात होता. भारतीय पर्यटकांच्या हत्येला कोण जबाबदार आहे, असा थेट प्रश्न केला. दहशतवादी निवडकपणे लोकांना मारत होते. दहशतवादी एक तास हत्या करत होते. या संपूर्ण काळात एकही सुरक्षा कर्मचारी दिसला नसल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
प्रियांका गांधी यांनी पुढे म्हटले की, 2020 ते 2025 दरम्यान टीआरएफने 25 हल्ले केले. 40 हून अधिक लष्करी जवान मृत्युमुखी पडले. अनेक नागरिक मृत्युमुखी पडले. सर्व काही तुमच्या माहितीत होते. पण तुमच्याकडे अशी कोणतीही एजन्सी नाही जी सांगू शकेल की पाकिस्तानमध्ये काहीतरी शिजत आहे.
मुंबई हल्ल्यावर काँग्रेसने काय केलं? प्रियांकाच्या उत्तराने सत्ताधारी शांत
advertisement
प्रियांका गांधी म्हणाल्या की सत्ताधारी पक्षाला फक्त काहीना काही कारणं हवी आहेत. तुम्ही इतिहासाबद्दल बोला, मी वर्तमानाबद्दल बोलेन असेही प्रियांका गांधी यांनी म्हटले.
प्रियांका गांधी म्हणाल्या की गृह मंत्र्यांनी मुंबई हल्ल्याचा उल्लेख केला. मात्र, या दहशतवादी हल्ल्या नंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. या घटनेची जबाबदारी त्यावेळी निश्चित होती. आता मात्र, पुलवामा हल्ला झाला, मणिपूर जळलं, पहलगाम घडला पण जबाबदारी कोणी घेतली नसल्याकडे प्रियांका गांधी यांनी सांगितले.
advertisement
प्रियंका गांधी म्हणाल्या की सरकार नेहरू आणि इंदिरा गांधींना प्रत्येक गोष्टीत ओढते, पण खऱ्या मुद्द्यापासून पळून जाते. ती म्हणाली, "तुम्ही माझ्या आईच्या अश्रूंबद्दल बोलता, पण लढाई का थांबवली हे सांगत नाही?" भावनिक होत प्रियांका म्हणाली, "जेव्हा माझे वडील शहीद झाले तेव्हा माझी आई फक्त ४४ वर्षांची होती. मला ते दुःख काय आहे हे माहित आहे." तिने म्हटले की जेव्हा सरकार खोटे आणि भित्रे बनते तेव्हा केवळ सैन्याची ताकदच नाही तर सरकारचे सत्य देखील महत्त्वाचे असते.
view commentsLocation :
New Delhi,Delhi
First Published :
July 29, 2025 3:07 PM IST
मराठी बातम्या/देश/
Priyanka Gandhi Vadra: ऑपरेशन सिंदूरवरून रणकंदन, अमित शाहांनी मुंबई हल्ल्यावरून छेडलं, प्रियांका गांधींच्या उत्तराने सत्ताधारी चिडीचूप


