५ वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज, 7 मिनिटं 29 सेकंदाचा VIDEO, पत्नीने धोका दिला अन् तरुणानं नको ते केलं...
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
वाराणसीच्या राहुल मिश्रा यांनी पत्नी संध्या सिंहच्या फसवणुकीमुळे मानसिक तणावात येऊन ७ मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करून आत्महत्या केली. पोलिस तपास सुरू आहे.
5 वर्षांपूर्वी आंतरजातिय प्रेम विवाह केला, सगळं काही ठीक सुरू होतं, एक बाळ झालं आणि तिथून ग्रह फिरायला सुरुवात झाली. पत्नीने धोका द्यायला सुरुवात केली. प्रेमात दगाबाजी करायला सुरुवात केली. पत्नीकडून सतत होणाऱ्या फसवणुकीला कंटाळून वाराणसीच्या तरुणानं 7 मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड करून आयुष्य संपवलं आहे. पत्नीनं केलेली फसवणूक आणि मानसिक वेदना सहन न झाल्याने ३० वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आयुष्य संपवलं.
आयुष्य संपवण्याच्या काही मिनिटे आधी या तरुणाने ७ मिनिटे २९ सेकंदांचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला, ज्यात त्याने आपली सर्व वेदना कॅमेऱ्यासमोर मांडली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वाराणसीच्या लोहता पोलीस स्टेशन क्षेत्रातील बनकट गावातील रहिवासी असलेल्या तरुणाने पाच वर्षांपूर्वी तरुणीशी प्रेमविवाह केला. जात-पात, समाजाची चर्चा आणि नातेवाईकांचा विरोध डावलून दोघांनी प्रेमविवाह केला. त्यांना एक लहान मूलही आहे.
advertisement
हे सुख फार काळ टिकले नाही. तरुणाच्या आयुष्यात वादळ तेव्हा आलं जेव्हा त्याची पत्नी शुभम सिंह उर्फ डेंजर नावाच्या तरुणाच्या संपर्कात आली. याच दुराव्यामुळे तरुण मानसिक तणावाखाली गेला. बाईकवरुन रेकॉर्ड केलेल्या या व्हिडिओमध्ये तरुण "मला जगायचे होते, असं वारंवार सांगत आहे मी माझ्या कुटुंबावर खूप प्रेम करतो, पण आता हा मानसिक ताण हा धक्का मला सहन होत नाही."
advertisement
व्हिडिओमध्ये तरुणाने पत्नीवर फसवणुकीचे थेट आरोप केले आहेत. त्याची पत्नी शुभम सिंह उर्फ डेंजरसोबत मिळून राहत आहे, तसेच लाख विनंती करूनही ती त्याच्याशी बोलणे थांबवत नाही, असे त्याने म्हटले आहे. "मला माझ्या मुलाची खूप आठवण येते, पण पत्नी मला त्याला भेटू देत नाही. माझ्याकडे आता कोणताही मार्ग उरलेला नाही," असे म्हणत त्याने अखेर टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या सासूवरही पत्नीला भडकावल्याचा गंभीर आरोप केला आहे.
advertisement
तरुणाचा हा हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही तासांतच त्याचा मृतदेह त्याच्या घरात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, कुटुंबात एकच आक्रोश सुरू आहे. तरुणाच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याची पत्नी, तिचा प्रियकर, शुभम सिंह उर्फ डेंजर आणि तरुणाच्या सासूच्या विरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
‘मैं वाइफ से बहुत प्यार करता था। मैं जीना चाहता था। आज सुसाइड कर रहा हूं। मुझे नहीं पसंद की मेरी वाइफ किसी और से बात करे, उसे कोई और होटल ले जाए’
वाराणसी में राहुल मिश्रा ने पत्नी संध्या सिंह की बेवफाई से दुखी होकर फांसी लगाकर जान दे दी। मरने से पहले उसने ये वीडियो बनाया। pic.twitter.com/C4MhrfW0vy
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) December 11, 2025
advertisement
व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून तपास सुरू
सोशल मीडियावर व्हिडीओ वेगानं व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये घेतलेल्या नावांवरुन पोलीस तपास करत आहेत. राहुलचा हा व्हिडीओ वाराणसीमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.7 मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये त्याने सांगितलं ते ऐकून प्रेम, नातेसंबंध यावरचा विश्वास उडाल्याच्या प्रतिक्रिया युजर्स सोशल मीडियावर देत आहेत.
Disclaimer: आत्महत्या करणं हा कोणत्याही समस्येवर तोडगा नाही. कोणत्याही अडचणीत असाल तर तुम्ही मानसिक तणाव दूर करण्यासाठी या हेल्पलाइन नंबरची मदत घेऊ शकता. मुंबई- 022-27546669, जीवन आधार: 1800-233-1250, काउन्सिलिंगसाठी हेल्पलाइन नंबर 14416 आणि 1800 8914416 नंबरवर तुम्ही संपर्क करु शकता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 11, 2025 2:50 PM IST
मराठी बातम्या/देश/
५ वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज, 7 मिनिटं 29 सेकंदाचा VIDEO, पत्नीने धोका दिला अन् तरुणानं नको ते केलं...









