Indian Railway : ट्रेननं प्रवास करताना खालची सीट हवीय? TTE ने सांगितला बुकिंगचा नवीन फंडा, ही ट्रीक नक्की करेल काम

Last Updated:

व्हिडिओमध्ये त्यांनी समजावून सांगितलं की रेल्वेमध्ये लोअर बर्थचं अलॉटमेंट खरं तर कसं होतं, आणि वरिष्ठ नागरिकांना नक्की खालची सीट मिळावी यासाठी बुकिंग करताना कोणती ट्रिक वापरावी.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : भारतात ट्रेनने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांचा एकच आग्रह असतो. “खालची सीट मिळाली पाहिजे!” विशेषतः वयस्कर प्रवाशांना वर-खाली चढणं कठीण जातं, त्यामुळे ते लोअर बर्थची मागणी करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, 1AC, 2AC, 3AC किंवा स्लीपर कोच कोणत्याही डब्यात खालच्या सीट्सची संख्या खूप मर्यादित असते? एका डब्यात खूपच कमी लोअर बर्थ असतात. त्यामुळे प्रत्येकाला ही सोय देणं शक्य होत नाही.
अलीकडेच सोशल मीडियावर डिब्रूगढ राजधानी एक्सप्रेसमधील एका TTEचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी समजावून सांगितलं की रेल्वेमध्ये लोअर बर्थचं अलॉटमेंट खरं तर कसं होतं, आणि वरिष्ठ नागरिकांना नक्की खालची सीट मिळावी यासाठी बुकिंग करताना कोणती ट्रिक वापरावी.
कसं मिळेल खालचं बर्थ?
त्या व्हिडिओत दाखवलं आहे की 12424 डिब्रूगढ राजधानी एक्सप्रेसमधील 3AC कोचमध्ये चार वरिष्ठ नागरिकांनी एकत्र तिकीट बुक केलं होतं. मात्र त्यांना सगळ्यांना वरच्या किंवा मधल्या सीट मिळाल्या. त्यामुळे त्यांनी TTEकडे विचारलं “आम्ही सगळे वरिष्ठ नागरिक आहोत, तरी आम्हाला खालच्या सीट का मिळाल्या नाहीत?”
advertisement
TTEनं सांगितलं खरं कारण
TTEनं शांतपणे आणि स्पष्ट शब्दांत समजावलं की रेल्वेचं सीट अलॉटमेंट सिस्टम पूर्णपणे संगणकावर चालतं आणि ते प्रवाशांच्या वय, बुकिंगच्या वेळ आणि उपलब्ध सीट्स यावर अवलंबून असतं. पण वरिष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या लोअर बर्थच्या सवलतीचा फायदा फक्त तेव्हाच मिळतो जेव्हा एका PNR वर दोनच तिकीटं बुक केली जातात.
जर एकाच PNRवर तीन-चार तिकीटं बुक केली, तर संगणक सर्व सीट्स संतुलितपणे वाटतो. त्यामुळे लोअर बर्थ मर्यादित असल्याने, काही वेळा वरिष्ठ नागरिकांनाही वरच्या सीट मिळतात.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Jalvesh Kumar (@jalveshp)



advertisement
काय करावं मग?
TTEनं सांगितलं “जर तुम्हाला खरंच खालची सीट हवी असेल, तर एकावेळी दोनच लोकांसाठी तिकीटं बुक करा. उदाहरणार्थ, चार लोक प्रवास करत असाल, तर दोन-दोनच्या ग्रुपमध्ये वेगवेगळं बुकिंग करा. यामुळे प्रत्येक बुकिंग वेगळं PNR मानलं जाईल आणि वरिष्ठ नागरिकांसाठी असलेली प्राथमिकता योग्य पद्धतीने लागू होईल.”
व्हिडिओनंतर काय प्रतिक्रिया?
TTEचा हा सल्ला ऐकल्यानंतर अनेक प्रवाशांनी त्याचे कौतुक केलं. त्यांचं म्हणणं होतं की ही माहिती आधी मिळाली असती तर बुकिंग करतानाच काळजी घेतली असती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी रेल्वे बुकिंग सिस्टीमबद्दल चर्चा सुरू केली आणि सुचवलं की रेल्वेने IRCTC वेबसाइट किंवा अॅपवर अशा माहितीचा स्पष्ट उल्लेख करावा, जेणेकरून वरिष्ठ नागरिकांना प्रवासात त्रास होऊ नये.
view comments
मराठी बातम्या/देश/
Indian Railway : ट्रेननं प्रवास करताना खालची सीट हवीय? TTE ने सांगितला बुकिंगचा नवीन फंडा, ही ट्रीक नक्की करेल काम
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement