Rajnath Singh : पाकिस्ताननं भारताची किती विमानं पाडली? संसदेतील चर्चेत राजनाथ सिंहांचे नागमोडी उत्तर...

Last Updated:

Rajnath Singh In Parliament: पाकिस्तानने भारताची लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला होता. या दाव्यावर राजनाथ सिंह यांनी थेट उत्तर न देता विरोधकांवर हल्लाबोल केला.

rajnath singh response on fighter jet
rajnath singh response on fighter jet
नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजपासून 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताने दहशतवाद्यांविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरवर उत्तर देताना य़ा मोहिमेचं यश अधोरेखित केले. पाकिस्तानने भारताची लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला होता. या दाव्यावर राजनाथ सिंह यांनी थेट उत्तर न देता विरोधकांवर हल्लाबोल केला.
लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, 'ऑपरेशन सिंदूर हे आमच्या ताकदीचे प्रतीक होते ज्यामध्ये आम्ही दाखवून दिले की जर कोणी आमच्या नागरिकांना मारले तर भारत गप्प बसणार नाही. आमची राजकीय व्यवस्था आणि नेतृत्व कोणत्याही दबावाशिवाय काम करेल. आमची क्षेपणास्त्रे भौतिक सीमा ओलांडतील, शूर सैनिक शत्रूचे कंबरडे मोडतील. आम्ही दहशतवादाच्या प्रत्येक प्रकाराचा अंत करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, 'ही कारवाई थांबवण्यात आली आहे, संपलेली नाही. भविष्यात पाकिस्तानकडून काही आगळीक घडल्यास ही कारवाई पुन्हा सुरू केली जाईल, असे म्हटले. त्यांनी पुढं म्हटले की, 10 मे रोजी पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओशी संपर्क साधला आणि भारताला लष्करी कारवाई थांबवण्याचे आवाहन केले. 12 मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये औपचारिक चर्चा झाली आणि दोन्ही बाजूंनी लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement

राजनाथ सिंह यांचा विरोधकांवर हल्लाबोल...

राजनाथ सिंह यांनी म्हटले की, 'विरोधकांनी आम्हाला एकदाही विचारले नाही की आमच्या सैन्याने किती शत्रू सैनिक मारले.
त्यांनी हे विचारले पाहिजे... की भारताने पाकिस्तानचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले का, त्याचे उत्तर आहे- हो
तुम्ही विचारले पाहिजे की ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले का, त्याचे उत्तर आहे- हो
advertisement
या ऑपरेशनमध्ये आमच्या शूर सैनिकांचे काही नुकसान झाले का, त्याचे उत्तर आहे- नाही.

राजनाथ सिंह यांचे नागमोडी उत्तर...

पाकिस्तानकडून 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतीय लढाऊ विमाने पाडली असल्याचा दावा करण्यात आला होता. विरोधकांनी देखील सरकारकडे पाकिस्तानच्या या दाव्यावर स्पष्टीकरण करण्याची मागणी केली होती. भारतीय हवाई दलाची लढाऊ विमाने पाडल्याच्या मुद्यावर बोलताना राजनाथ सिंह यांनी म्हटले की, पेन्सिल तुटली की पेन तुटला हे महत्त्वाचे नाही तर निकाल चांगला आला हे महत्त्वाचं असल्याचे त्यांनी म्हटले.
view comments
मराठी बातम्या/देश/
Rajnath Singh : पाकिस्ताननं भारताची किती विमानं पाडली? संसदेतील चर्चेत राजनाथ सिंहांचे नागमोडी उत्तर...
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement