RJDला मदन शाह यांचा तळतळाट लागला, कपडे फाडून रडले अन् म्हणाले- तुम्हाला फक्त 25 जागा मिळतील, भविष्यवाणी खरी ठरली

Last Updated:

RJD leader Madan Shah: तिकीट नाकारल्याने व्यथित झालेल्या RJD नेते मदन शाह यांचा '25 जागांचा तळतळाट' बिहार निवडणुकीत खरा ठरल्याचा दावा त्यांनी केला आहे. तिकीट वाटपात लालू यादव यांचा सल्ला डावलल्यामुळे तसेच पक्षातील कथित 'चाणक्यां'मुळे RJD चा दारूण पराभव झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

News18
News18
नवी दिल्ली: राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते मदन शाह जे गेल्या महिन्यात तिकीट न मिळाल्याने आपले कपडे फाडून आणि जमिनीवर पडून रडताना दिसले होते, त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीतील महागठबंधनाच्या दारूण पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. तिकीट नाकारल्याच्या दु:खामुळे आपण वेडे झालो होतो, असे सांगताना शाह म्हणाले- मी पाटणा येथे लालूप्रसाद यादव यांना भेटायला गेलो, पण कोणीही भेटले नाही. मला इतके दुःख झाले की मी कपडे फाडले, जमिनीवर पडलो आणि त्यांच्या पक्षाला 25 जागांवर समाधान मानावे लागेल असा शाप दिला आणि ते खरे ठरले.
advertisement
मला पक्षाच्या या पराभवाचे दुःख आहे. पण जे देव करतो, ते चांगलेच असते. त्यांनी पक्षातील तथाकथित 'चाणक्यां'वर निशाणा साधला आणि ते पक्ष बर्बाद करत असल्याचा आरोप केला. जोपर्यंत त्यांना पक्षातून बाहेर काढले जात नाही, तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. या निवडणुकीत तिकीट वाटपासाठी लालूप्रसाद यादव यांचा सल्ला घेतला गेला नाही, म्हणूनच पक्षाला हे अपयश आल्याचे शाह म्हणाले.
advertisement
तिकिटासाठी पैसे मागितल्याच्या प्रश्नावर मदन शाह यांनी खुलासा केला की, त्यांच्याकडे थेट कोणाकडूनही मागणी झाली नव्हती. मी 1990 पासून पक्षासोबत जोडलेला आहे, कार्यकर्ता आहे, पक्षासाठी काम करतो. मग मी तिकिटासाठी पैसे कशाला आणि कुठून देणार? असा सवाल त्यांनी केला. त्यांनी मधुबनमधून तिकीट दिलेल्या व्यक्तीवरही टीका केली, जो पक्षाचा प्राथमिक सदस्यही नव्हता आणि सरकारी डॉक्टर असूनही पत्नीच्या नावावर तिकीट घेतले. लालू यादव आणि तेजस्वी यादव यांनी आश्वासन दिल्यानंतरही आपले तिकीट कापले गेले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. घोषणा होण्याच्या 2 वाजेपर्यंत आपल्याला तिकीट मिळणार असे सांगण्यात आले होते, पण यादीत नाव नव्हते.
advertisement
advertisement
तिकीट कापल्यामुळे झालेल्या दु:खातूनच त्यांनी पाटणातील लालू यादव यांच्या निवासस्थानाबाहेर जमिनीवर लोळण घेतली, पण त्यांना कोणालाही भेटू दिले गेले नाही. शाह यांनी थेट संजय यादव यांच्यावर आरजेडीच्या या दुर्दशेसाठी जबाबदारी ढकलली आणि त्यांना पक्षातून बाहेर काढल्याशिवाय परिस्थिती सुधारणार नाही, असे ठामपणे सांगितले.
advertisement
बिहार निवडणुकीत आरजेडीला केवळ 25 जागांवर समाधान मानावे लागले, जे मदन शाह यांच्या भविष्यवाणीशी जुळते. अंतर्गत कलह आणि तिकीट वाटपावरून उठलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर मदन शाह यांचे हे विधान सध्या चर्चेत आहे. भाजप आणि जदयूच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) 207 जागांसह प्रचंड बहुमत मिळाले, तर आरजेडीच्या नेतृत्वाखालील महागठबंधन 35 जागांवर (RJD: 25, Congress: 6, Left: 3, IIP: 1) संपुष्टात आले. तसेच, असदुद्दीन ओवैसींच्या AIMIM ने 5 आणि बसपाने 1 जागा जिंकून खाते उघडले.
advertisement
view comments
मराठी बातम्या/देश/
RJDला मदन शाह यांचा तळतळाट लागला, कपडे फाडून रडले अन् म्हणाले- तुम्हाला फक्त 25 जागा मिळतील, भविष्यवाणी खरी ठरली
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement