गुरू पोर्णिमेच्या दिवशी शाळेत रक्ताचा सडा, दोन विद्यार्थ्यांकडून प्रिन्सिपलचा मर्डर

Last Updated:

दोन विद्यार्थ्यांनी ऐन गुरू पोर्णिमेच्या दिवशी गुरु-शिष्याला कलंकित करणारं कांड केलं आहे.दोघांनी आपल्या मुख्याध्यापकाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली आहे.

News18
News18
आज संपूर्ण देशभर गुरू पोर्णिमा साजरी केली जात आहे. गुरू आणि शिष्याच्या पवित्र नात्याचा आदर करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पण दोन विद्यार्थ्यांनी ऐन गुरू पोर्णिमेच्या दिवशी गुरु-शिष्याला कलंकित करणारं कांड केलं आहे. त्यांनी आपल्या मुख्याध्यापकाची हत्या केली आहे. आरोपी विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारातच मुख्याध्यापकावर चाकुने हल्ला केला. हा हल्ला इतका भयंकर होता की मुख्याध्यापक रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
जगबीर सिंह असं हत्या झालेल्या मुख्याध्यापकाचं नाव आहे. ते हरियाणातील हिसार जिल्ह्यातील बन्स बादशाहपूर गावात असलेल्या कर्तार मेमोरियल सीनियर सेकंडरी स्कूलचे मुख्याध्यापक होते. आज गुरु पोर्णिमेच्या दिवशीच शाळेत एक खळबळजनक घटना समोर आली. ज्यामुळे गुरु-शिष्य नात्याला कलंक लागला आहे. शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी त्यांचे मुख्याध्यापक जगबीर सिंग यांच्यावर चाकूने हल्ला केला. जखमी अवस्थेत, शाळेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ हिसारमधील एका खाजगी रुग्णालयात नेले, जिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शाळेच्या आवारात घडली. ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरला. असं सांगितले जात आहे की, विद्यार्थ्यांनी अचानक मुख्याध्यापकांवर चाकूने हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास सुरू केला. दुसरीकडे, घटनेनंतर दोन्ही विद्यार्थी फरार झाले आहेत. दोन्ही विद्यार्थ्यांची ओळख पटली आहे. ते ११वी आणि १२वीचे विद्यार्थी आहेत, जे अल्पवयीन असल्याचे सांगितले जात आहे.
advertisement
प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही हल्लेखोर एकाच शाळेचे विद्यार्थी आहेत. त्यांचा कोणत्या तरी कारणावरून मुख्याध्यापकांवर राग होता. याच रागातून त्यांनी हे हत्याकांड घडवलं आहे. पोलीस दोन्ही विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत आणि संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केली जात आहे. या घटनेनंतर शाळेतील कर्मचाऱ्यांमध्ये आणि गावात तीव्र दुःख आणि संताप आहे.
मराठी बातम्या/देश/
गुरू पोर्णिमेच्या दिवशी शाळेत रक्ताचा सडा, दोन विद्यार्थ्यांकडून प्रिन्सिपलचा मर्डर
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement