मोठी बातमी! शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या मुलीचा मृत्यू; वाढदिवसाच्या दिवशीच कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Last Updated:

लेकीच्या वाढदिवसाची घरात जय्यत तयारी सुरू असून त्याच दिवशी ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

News18
News18
नवी दिल्ली : शिवसेना नेते दीपक कंबोज यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळल आहे. लेकीच्या वाढदिवसाच्या दिवशी तिचा मृत्यू झाला आहे. बाथरूममध्ये गीजर लिक झाल्याने श्वास गुदमरून तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक समोर आला आहे. लेकीच्या वाढदिवसाची घरात जय्यत तयारी सुरू होती मात्र या घटनेने आता कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना घडल्याने परिसरातील लोक हळहळ व्यक्त करत आहेत.
पंजाबच्या जालंधरचे शिवसेना नेते दीपक कंबोज यांच्या मुलीचे नाव मुनमुन आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी तिचा वाढदिवस असल्याने घरात त्याची जोरदार तयारी सुरू होती. नातेवाईकांना, मित्रपरिवराल बोलवण्यात आले होते.मुनमुन अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली त्यावर शॉवरसाठी गीझर सुरु केला त्यावेळी गीझरच्या पाईपमधून गॅस पाईप लीत झाला.गॅस लीक झाल्याने बाथरुममध्ये श्वास गुदमरला आणि जीव गेला. बराच वेळ अंघोळीसाठी मुनमुन बाहेर न आल्याने घरच्यांनी दरवाजा वाजवला मात्र आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाज तोडण्याच आला. त्यावेळी बेशुद्ध पडलेल्या मुनमुनला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.
advertisement

मुनमुनसोबत नेमकंं काय घडलं? 

समोर आलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुनमुनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून त्याचा रिपोर्ट आल्यानंतर मुनमुनवर किशनपुरा स्मनाभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे गीझरमध्ये तांत्रिक बिघाड होता की अपुरा गॅस व्हेंटिलेशन होता याचाही तपास सुरू आहे.
advertisement

निधनानंतर कुटुंबियांचा आक्रोश 

मुनमुनचे पिता दीपक कंबोज म्हणाले की, आमच्या कुटुंबाने वाढदिवस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विशेष तयारी केली होती. नातेवाईक आणि मित्रांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु आनंदाचे वातावरण अचानक शोकात बदलले. मुनमुन अतिशय मनमिळाऊ स्वभावाची मुलगी होती. तिच्या या स्वभावामुळे घरात नेहमी वातावरण आनंदाचे असे.
view comments
मराठी बातम्या/देश/
मोठी बातमी! शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या मुलीचा मृत्यू; वाढदिवसाच्या दिवशीच कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Next Article
advertisement
Shiv Sena UBT MNS Candidate List BMC: ठाकरे बंधुंच्या 227 उमेदवारांची फायनल लिस्ट! पाहा तुमच्या प्रभागातून कोण लढणार?
BMC Election: ठाकरे बंधुंच्या 227 उमेदवारांची फायनल लिस्ट! पाहा तुमच्या प्रभागात
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कोणत्याच पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर के

  • जागा वाटपाचा घोळ, इच्छुकांची असलेली मोठी संख्या यामुळे यादी जाहीर झाली नव्हती.

  • ठाकरे बंधूंच्या युतीमधील उमेदवारांची यादी अखेर समोर आली आहे.

View All
advertisement