प्रेग्नंट वहिनी रात्री 2 वाजता दिराच्या खोलीत घुसली, पुढच्या काही मिनिटात किंकाळ्यांनी घर हादरलं

Last Updated:

रात्री 2 वाजता प्रेग्नंट वहिनी दिराच्या खोलीत शिरली, त्यानंतर घरात एकच आक्रोश आणि किंकाळ्या सुरू झाल्या. समोरचं दृश्य पाहून कुटुंबही हादरलं आहे.

प्रेग्नंट वहिनी रात्री 2 वाजता दिराच्या खोलीत घुसली, पुढच्या काही मिनिटात किंकाळ्यांनी घर हादरलं (AI Image)
प्रेग्नंट वहिनी रात्री 2 वाजता दिराच्या खोलीत घुसली, पुढच्या काही मिनिटात किंकाळ्यांनी घर हादरलं (AI Image)
छोट्या बहिणीला प्रेमात धोका दिल्यानंतर वहिनीने चाकूने दीराचा प्रायव्हेट पार्ट कापला आहे. दिरावर जीवघेणा हल्ला केल्यानंतर वहिनी तिथून पळून गेली, तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दीर थराथरा कापत होता. दीराचा आवाज ऐकून कुटुंबातील सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्याला रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवण्यासाठी शस्त्रक्रिया केली.
वहिनी मंजूने मध्यरात्री कट रचून मध्यरात्री तिचा दीर उमेश कुमार याच्यावर हल्ला केला. उमेश झोपलेला असल्याचं बघून मंजू त्याच्या खोलीत शिरली आणि त्याच्या गुप्तांगावर सपासप वार केले. हल्ला केल्यानंतर मंजू तिथून फरार झाली. पोलीस आता मंजूचा शोध घेत आहेत.

धाकट्या बहिणीसोबतच प्रेमसंबंध

प्रयागराजमधील मौयमा येथील मलखानपूर, मिश्री पट्टी येथील रहिवासी राम आसरे यांना पाच मुले आहेत. त्यांचा दुसरा मुलगा उदय कुमार याने चार वर्षांपूर्वी मौईमा पोलीस स्टेशन परिसरातील काहली गावातील रहिवासी मंजूशी लग्न केले. त्यांना एक दोन वर्षांचा मुलगा देखील आहे.
advertisement
तीन वर्षांपूर्वी मंजूचा धाकटा दीर उमेश कुमार याचे मंजूच्या धाकट्या बहिणीसोबत प्रेमसंबंध सुरू झाले. तसंच उमेशने तिला लग्नाचंही वचन दिलं. दोघांच्याही प्रेमाची कुटुंबाला माहिती होती आणि लग्नाची बोलणीही सुरू झाली, पण 3 महिन्यांपूर्वी उमेशने अचानक तिच्यासोबत लग्न करायला नकार दिला. आपण दुसऱ्या कुणावर तरी प्रेम करत आहोत, त्यामुळे आपण हे लग्न करू शकत नाही, असं उमेशने सांगितलं. उमेशने नकार दिल्यानंतर कुटुंबानेही हे नाते स्वीकारायला नकार दिला. पण मंजूने उमेशला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकला नाही, त्यामुळे मंजू आणि उमेशमध्ये कडाक्याचं भांडण झालं.
advertisement
प्रेमामध्ये विश्वासघात झाल्यानंतर मंजूची बहीण नैराश्येत गेली आणि तिच्या मनात जीव द्यायचे विचार येऊ लागले. बहिणीची ही अवस्था पाहून मंजूने उमेशला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. 16 ऑक्टोबरला रात्री 2 वाजा मंजू उमेशच्या खोलीत चाकू घेऊन गेली, आणि तिने झोपलेल्या उमेशच्या गुप्तांगावर चाकूने हल्ला केला. हल्ल्यानंतर उमेश जोरजोरात ओरडायला लागला, त्यामुळे घरातल्यांना जाग आली आणि ते उमेशच्या खोलीत धावले. उमेशला रक्ताच्या थारोळ्यात पाहून कुटुंबाने त्याला ताबडतोब रुग्णालयात नेलं आणि त्याला ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आलं.
advertisement

उमेशला वाचवण्यात यश

मूत्रविज्ञान विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. शिरीष मिश्रा यांनी सांगितले की, दीड तासांच्या शस्त्रक्रियेनंतर त्याचा जीव वाचला असून तो आता धोक्याबाहेर आहे. त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी सहा ते आठ महिने लागू शकतात. तो सध्या जवळच्या वैद्यकीय देखरेखीखाली आहे.

कुटुंबातील सदस्यांची चौकशी

एसीपी विवेक यादव यांच्या मते, उमेशची वहिनी मंजूने त्याच्या गुप्तांगावर हल्ला केला. तिच्या बहिणीशी असलेले नाते बिघडवल्याबद्दल ती त्याला धडा शिकवू इच्छित होती. मंजूचा शोध घेतला जात आहे. तिच्या कुटुंबाची चौकशी करण्यात आली आहे. तसंच मंजू गर्भवती असल्याचंही समोर आलं आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
प्रेग्नंट वहिनी रात्री 2 वाजता दिराच्या खोलीत घुसली, पुढच्या काही मिनिटात किंकाळ्यांनी घर हादरलं
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement