स्वतःच्या मृत्यूची खोटी बातमी, मग बायकोलाच संपवलं… मुंबईच्या प्रेयसीसोबत लग्नासाठी सर्जनने रचला खतरनाक कट
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
बेंगळुरूतील डॉक्टर कृतिका हत्याकांडातील आरोपी पतीबद्दल एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. हत्येनंतर तो इतर महिलांना लग्नाचा प्रस्ताव देत होता.
Crime News : डॉ. महेंद्र रेड्डी जी.एस. यांच्या घरी सर्व काही व्यवस्थित चालले होते, पण एके दिवशी अचानक असे काही घडले ज्याने त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. या वर्षी एप्रिलमध्ये, त्यांची पत्नी डॉ. कृतिका एम. रेड्डी त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळली. त्या एक प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ होत्या, तर त्यांचे पती डॉ. महेंद्र रेड्डी जी.एस. एक जनरल सर्जन होते. 6 महिन्यांपूर्वी झालेल्या या महिला डॉक्टरचा मृत्यू नैसर्गिक नव्हता तर तिची हत्या करण्यात आली असल्याच्या दाव्याला आता आणखी बळकटी मिळाली आहे.
आधी हत्या केली मग महिलांना केला मॅसेज
मृत महिला ही त्वचारोगतज्ज्ञ होती आणि तिचा पती महेंद्र रेड्डी हा सर्जन आहे. मृत महिलेचे नाव कृतिका असून तिचा महेंद्रनेच खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. कृतिकाला ठार मारल्यानंतर महेंद्रने त्याच्या प्रेयसीला मेसेज पाठवला होता की, 'तुझ्यासाठी बायकोला मारून टाकलंय.' महेंद्रवर पोलिसांना संशय असल्याने त्यांनी त्याचा फोन ताब्यात घेतला होता. फोनच्या फॉरेन्सिक तपासणीत त्याने प्रेयसीसोबत केलेलं चॅट सापडलं होतं. कोणाला कळू नये यासाठी तो हे चॅटींग डिजिटल पेमेट अॅपवर करत होता.
advertisement
पोलिसांनी सांगितले की रेड्डीने एका महिलेला कबूल केले की त्याने त्याच्या पत्नीची हत्या केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, महेंद्रने चार ते पाच महिलांना मेसेज पाठवले, ज्यात एका वैद्यकीय व्यावसायिकाचाही समावेश होता. पोलिसांनी सांगितले की रेड्डीने त्यांना मेसेज केला की, "मी तुमच्यासाठी माझ्या पत्नीची हत्या केली." विशेष म्हणजे, महिलेने त्याला अनेक अॅप्सवर ब्लॉक केले होते, त्यानंतर रेड्डी यांनी फोनपे अॅपवर हा मेसेज पाठवला. असे वृत्त आहे की महेंद्र दुसऱ्यांदा लग्न करण्याच्या प्रयत्नात महिलांच्या संपर्कात आला होता. महेंद्रने २४ एप्रिल रोजी भूल देऊन कृतिकाची हत्या केली. नंतर पोलिसांनी त्याला 14 ऑक्टोबर रोजी उडुपी जिल्ह्यात अटक केली.
advertisement
महिलेने महेंद्र रेड्डीला ब्लॉक केले होते
पोलिसांनी त्याच्याकडून एक मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केला, जो चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला. तपासादरम्यान त्याने महिलेला पाठवलेले मेसेज उघड झाले. डीसीपी व्हाइटफील्ड म्हणाले, "महेंद्रने फोनपे द्वारे महिलेला मेसेज पाठवले. महिलेचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तिने पोलिसांना सांगितले की तिने रेड्डीला त्याच्या लग्नापूर्वी ब्लॉक केले होते. कृतिकाशी लग्न केल्यानंतर तिने महेंद्रपासून स्वतःला दूर केले. तिने सांगितले की गुन्ह्यात तिची कोणतीही भूमिका नाही."
advertisement
2023 पर्यंत महिलेच्या संपर्कात होता
एवढेच नाही तर महेंद्रने मुंबईतील एका महिलेशी संपर्क साधला. अहवालानुसार, तपास अधिकाऱ्यांना असे आढळून आले की महेंद्र 2023 पर्यंत मुंबईतील एका महिलेशी संपर्कात होता. त्याने तिला अनेक वेळा लग्नाचा प्रस्तावही ठेवला. तथापि, नंतर त्याने त्याच्या वडिलांना त्या महिलेला फोन करायला लावला आणि त्याचा मृत्यू झाला असल्याची खोटी माहिती द्यायला लावली. त्यानंतर दोघांमध्ये कोणताही संपर्क झाला नाही. त्यानंतर, सप्टेंबरमध्ये महेंद्रने मुंबईतील महिलेशी पुन्हा संपर्क केला आणि तिला सांगितले की तो मृत नाही. त्याने तिला सांगितले की त्याच्या कुंडलीनुसार त्याची पहिली पत्नी मरणार आहे. रेड्डी म्हणाले की आता त्याची पत्नी मरण पावली आहे, त्यामुळे तो तिच्याशी लग्न करू इच्छितो.
advertisement
औषधाच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू
view comments21 एप्रिल रोजी डॉ. महेंद्र रेड्डी याने त्याची पत्नी डॉ. कृतिका रेड्डी हिला ठार मारल्याचा त्याच्यावर आरोप आहे. ऑपरेशनपूर्वी देण्यात येणाऱ्या गुंगीच्या औषधाचा ओव्हरडोस दिल्याने कृतिकाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कृतिकाला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने पतीनेच तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते, जिथे तिला मृत घोषित करण्यात आले. महेंद्र आणि कृतिका यांचे लग्न 26 मे 2024 रोजी झाले होते आणि दोघेही बंगळुरूच्या व्हिक्टोरिया रुग्णालयात कार्यरत होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 05, 2025 9:31 AM IST
मराठी बातम्या/देश/
स्वतःच्या मृत्यूची खोटी बातमी, मग बायकोलाच संपवलं… मुंबईच्या प्रेयसीसोबत लग्नासाठी सर्जनने रचला खतरनाक कट


