नियंत्रण सुटलं आणि स्विफ्ट थेट दरीत, भावजी-मेहुण्यासह 6 जणांचा जागीच मृत्यू
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
कारवर नियंत्रण सुटल्याने 500 मीटर दरीत कार कोसळून जागीच 6 जणांचा मृत्यू झाला. बानीखेतहून परत येत असताना, गावापासून सुमारे एक किलोमीटर आधी भांजराडू ते चानवास शाहवा रस्त्यावर रात्री स्विफ्ट कार दरीत कोसळली.
स्विफ्ट कारचं नियंत्रण सुटलं आणि भरधाव कार कठडा सोडून थेट दरीत गेली. काही कळण्याच्या आत 500 मीटर दरीत कोसळून चुराडा झाला आणि होत्याचं नव्हतं झालं. नियतीनं घात केला, दोन कुटुंब उद्ध्वस्त झाले. मिळालेल्या माहितीनुसार, चानवास येथील एका सरकारी शाळेतील शिक्षक राजेश कुमार यांचा त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसह अपघातात मृत्यू झाला. याशिवाय त्यांच्या मेहुण्यालाही आपला जीव गमवावा लागला आहे.
हे सगळे जण स्विफ्ट कारमधून प्रवास करत होते. राजेश त्यांच्या मुली (१७) आणि मुलाला (१५) बानीखेतहून घरी परत आणत होते. मुले बानीखेतमध्ये शिकत आहेत. यादरम्यान, मेहुणे हेमराज उर्फ फौजी देखील कारमधून प्रवास करत होते. याशिवाय, गावातील आणखी एका व्यक्तीनेही कारमध्ये लिफ्ट घेतली होती. ही धक्कादायक घटना हिमाचल प्रदेशमध्ये घडल्याची माहिती मिळाली आहे.
advertisement
कारवर नियंत्रण सुटल्याने 500 मीटर दरीत कार कोसळून जागीच 6 जणांचा मृत्यू झाला. बानीखेतहून परत येत असताना, गावापासून सुमारे एक किलोमीटर आधी भांजराडू ते चानवास शाहवा रस्त्यावर रात्री स्विफ्ट कार दरीत कोसळली. गाडी खोल दरीत पडताना किंचाळण्याचे आवाज आले. स्थानिक लोकांनी तात्काळ पोलीस आणि प्रशासनाला माहिती दिली.
माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. सर्व मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले. अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिक प्रशासनाने मृतांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
advertisement
मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला. त्याच वेळी, माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी शोक व्यक्त केला आहे आणि लिहिले आहे की, चंबा जिल्ह्यातील तीसा येथील चानवास येथे झालेल्या कार अपघातात सहा जणांचा मृत्यू होणे अत्यंत दुःखद आहे. शोकाकुल कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. देव मृतांच्या आत्म्याला शांती देवो आणि कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.
Location :
Himachal Pradesh
First Published :
August 08, 2025 9:56 AM IST