अब तक 14! अदृश्य शक्तीकडून पाकमधील भारताचा आणखी एक शत्रू ठार, जैशला धक्का

Last Updated:

Terrorist Killed In Pakistan : आज समोर आलेल्या वृ्त्तानुसार, पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मदच्या एका कमांडरचा खात्मा करण्यात आला आहे.

News18
News18
नवी दिल्ली: भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा सुरू आहे. अज्ञात व्यक्ती, अदृश्य शक्तींकडून या दहशतवाद्यांचा खात्मा सुरू आहे. आतापर्यंत 14 दहशतवाद्यांच्या महत्त्वाच्या नेत्यांना यमसदनी पाठवण्यात आले आहे. आज समोर आलेल्या वृ्त्तानुसार, पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मदच्या एका कमांडरचा खात्मा करण्यात आला आहे.
पाकिस्तानस्थित दहशतवादी गट जैश-ए-मोहम्मदचा वरिष्ठ सदस्य मौलाना अब्दुल अजीज इसार यांचा गूढ परिस्थितीत मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशातील सुरक्षा संस्था अलर्ट मोडवर आल्या आहेत. जैश-ए-मोहम्मदचे संस्थापक मौलाना मसूद अझहर यांच्या जवळचे मानले जाणारे इसार याच्या मृत्यूच्या कारणाबद्दल वेगवेगळ्या अटकळ बांधल्या जात आहेत.
पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, मौलाना अब्दुल अजीज इसार यांचा मृत्यू अचानक झाला आणि त्यामागील कारणे स्पष्ट नाहीत. काही वृत्तांमध्ये असेही म्हटले आहे की त्यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, ही कट रचून केलेली हत्या असू शकते, असा संशय निर्माण होतो. मात्र, पाकिस्तान सरकार किंवा जैश-ए-मोहम्मदकडून अधिकृतपणे कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
advertisement
भारतातील संरक्षण विषयक तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, इसार यांचा मृत्यू जैश-ए-मोहम्मदमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहाचा किंवा सत्ता संघर्षाचा परिणाम असू शकतो. याशिवाय, आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने इसारचा काटा काढला असू शकतो.
जैश-ए-मोहम्मदने भारतातील अनेक मोठे दहशतवादी हल्ले केले आहे. ज्यात 2001 मध्ये भारतीय संसदेवर हल्ला आणि 2016 मध्ये पठाणकोट येथील लष्करी तळावरील हल्ल्याचा समावेश आहे. भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर या संघटनेविरुद्ध कारवाई करण्याची मागणी अनेक वेळा केली आहे.
advertisement

>> अज्ञात व्यक्तींना आतापर्यंत यमसदनी पाठवलेले दहशतवादी...

> वर्ष 2022
मार्च 1:
झहूर मिस्त्री – IC-814 विमान अपहरण प्रकरणातील आरोपी, कराचीत गोळ्या घालून ठार.
जुलै 14:
रिपुदमन सिंग मलिक – बाबर खालसा संघटनेचा माजी सदस्य, कॅनडात गोळ्यांनी ठार.
> वर्ष 2023
फेब्रुवारी 20:
बशीर अहमद पीर – हिजबुल मुजाहिदीनचा टॉप कमांडर, रावळपिंडी (पाक) येथे ठार.
advertisement
मार्च 4 :
सय्यद नूर शालोबर – ISI व पाक लष्कराशी संबंध असलेला, खैबर पख्तूनख्वा (पाक) येथे ठार.
मे 6:
परमजीत सिंग पंजवार – खालिस्तान कमांडो फोर्सचा प्रमुख, लाहोरमध्ये ठार.
जून 16:
अवतार सिंग खांडा – युकेमध्ये खालिस्तानी नेता, बर्मिंगहॅममध्ये संशयास्पद मृत्यू.
जून 19 :
हरदीप सिंह निज्जर – कॅनडातील KTF प्रमुख, गुरुद्वाऱ्याच्या पार्किंगमध्ये ठार.
advertisement
सप्टेंबर 8 :
अबू कासिम काश्मिरी (रियाज अहमद) – डंगरी हल्ल्याचा सूत्रधार, पीओके मध्ये नमाजदरम्यान गोळ्या.
सप्टेंबर 29:
जिया-उर-रहमान – लष्करचा कट्टर समर्थक, कराचीत गोळ्या घालून ठार.
ऑक्टोबर 11:
शाहिद लतीफ – पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड, सियालकोट येथे मशिदीत ठार.
> वर्ष 2024
मार्च 15:
अबू कताल – डंगरी व रेसी हल्ल्यांचा मास्टरमाईंड, झेलम (पाक) येथे ठार.
advertisement
जून 17:
अमीर हमजा – माजी पाक ब्रिगेडियर, ISI लिंक, पाकिस्तानात ठार.
> वर्ष 2025
सैफुल्ला खालिद – लष्करचा टॉप कमांडर, पंजाब (पाकिस्तान) येथे अज्ञात हल्लेखोरांकडून ठार.
view comments
मराठी बातम्या/देश/
अब तक 14! अदृश्य शक्तीकडून पाकमधील भारताचा आणखी एक शत्रू ठार, जैशला धक्का
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement