भारतातून चंद्रग्रहण दिसेल, पण दिसणार नाही सूर्यग्रहण, जाणून घ्या वेळ आणि दिवस

Last Updated:

यंदाचं पहिलं सूर्यग्रहण एप्रिल महिन्यात झालं होतं, तर दुसरं अमावस्येला पाहायला मिळेल.

हे ग्रहण अशावेळी आहे जेव्हा चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकत नाही.
हे ग्रहण अशावेळी आहे जेव्हा चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकत नाही.
कालूराम जाट, प्रतिनिधी
दौसा, 14 ऑक्टोबर : आज 14 ऑक्टोबरला सर्वत्र भारत, पाकिस्तान सामन्याची जोरदार चर्चा आहे. तर, खगोलप्रेमी मात्र आज दिसणाऱ्या वर्षातील अखेरच्या सूर्यग्रहणाच्या प्रतीक्षेत आहेत. हे ग्रहण मेक्सिको, मध्य अमेरिका, कोलंबिया, ब्राझील, इत्यादी पाश्चिमात्य देशांमधून दिसेल. परंतु भारतातून मात्र ते पाहायला मिळणार नाही.
ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला विशेष महत्त्व असतं. आजचं सूर्यग्रहण कंकणाकृती असेल जे 8 वाजून 33 मिनिटे 50 सेकंदांनी सुरू होईल. यंदाचं पहिलं सूर्यग्रहण एप्रिल महिन्यात झालं होतं, तर दुसरं आज अमावस्येला पाहायला मिळेल. रात्री 2 वाजून 25 मिनिटे 16 सेकंदांनी हे ग्रहण समाप्त होईल. यानंतर 15 दिवसांच्या अंतराने चंद्रग्रहण असेल, जे भारतातून पाहता येईल.
advertisement
महत्त्वाचं म्हणजे आजचं सूर्यग्रहण अशावेळी आहे जेव्हा चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकत नाही. शिवाय सूर्यकिरणांचा चंद्राच्या सर्व कडांवर लख्ख प्रकाश पडतो. त्यामुळे हे ग्रहण पाहणं म्हणजे पाश्चिमात्य देशांतील लोकांसाठी पर्वणीच असेल.
advertisement
दरम्यान, साल 3000 पासून आतापर्यंत 11898 सूर्यग्रहण झाले असून पुढच्या वर्षी 8 एप्रिल आणि 2 ऑक्टोबरला सूर्यग्रहण असेल जे भारतातून पाहायला मिळेल. यापैकी पहिलं ग्रहण पूर्ण आणि दुसरं ग्रहण कंकणाकृती असणार आहे.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g
मराठी बातम्या/देश/
भारतातून चंद्रग्रहण दिसेल, पण दिसणार नाही सूर्यग्रहण, जाणून घ्या वेळ आणि दिवस
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement