धक्कादायक! AC सुरू करून गेले डॉक्टर, थंडीने दोन नवजात बाळांचा मृत्यू
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
खाजगी रुग्णालयात एसीच्या जास्त स्पीडमुळे दोन नवजाच बालकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडालीय.
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : खाजगी रुग्णालयात एसीच्या जास्त स्पीडमुळे दोन नवजाच बालकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडालीय. मुलांच्या कुटुंबियांनी डॉक्टरवर आरोप केले असून तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
एसीमुळे नवजात बाळांचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशमधून समोर आली आहे. शामली जिल्ह्यातील कैराना भागात क्लिनिकच्या डॉक्टरांनी शनिवारी रात्री झोपताना एसू चालूच ठेवला. रात्रभर रुम थंड राहिली आणि यामुळे रविवारी सकाळी दोन नवजात बालकांचा मृत्यू झाला. कुटुंबिय मुलांना पाहण्यासाठी आल्यावर दोघेही बाळं मृतावस्थेत आढळले.
advertisement
कुटुंबियांनी क्लिनिकच्या मालक डॉ. नीतू यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन, डॉ. नीतू यांच्यावर कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. कुटुंबिय सध्या बाळांच्या मृत्यूमुळे धक्क्यात आहेत.
दरम्यान, ही धक्कादायक घटना जोरदार व्हायरल होत असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एसीची हवा किती घातक ठरु शकते याच्या यापूर्वीही अनेक घटना समोर आल्या आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 25, 2023 12:44 PM IST







