ram mandir : असा अनोखा रामभक्त पाहिला नसेल, 5 वर्षांनी पूर्ण होणार हा 'महासंकल्प', नेमकं काय ठरवलं होतं?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
राम मंदिरात प्रभू रामाच्या उपस्थितीबाबत अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रतिज्ञा केल्या होत्या. धार्मिक नगरी अयोध्येत बलियाचा एक तरुण असा आहे, जो आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी अयोध्येला पोहोचला आहे.
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी
अयोध्या : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील भव्य आणि दिव्य अशा श्रीराम मंदिरात रामलला विराजमान होणार आहेत. त्यासाठी संपूर्ण देशात एक उत्साहाचे वातावरण दिसत आहे. प्रभू रामाच्या स्वागतासाठी सर्व रामभक्त उत्सुक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमामध्ये यजमानाच्या भूमिकेत राहणार आहेत. अनेक राम भक्त आपापल्या पद्धतीने राम मंदिराला भेटवस्तू देत आहेत. यातच एक भक्त असा आहे, ज्याने राम मंदिराच्या निर्माणासाठी एक अनोखा महासंकल्प केला होता.
advertisement
राम मंदिरात प्रभू रामाच्या उपस्थितीबाबत अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रतिज्ञा केल्या होत्या. धार्मिक नगरी अयोध्येत बलियाचा एक तरुण असा आहे, जो आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी अयोध्येला पोहोचला आहे. रुपेश असे या तरुणाचे नाव आहे. रुपेश हे व्यवसायाने सँड आर्ट आर्टिस्ट आहेत.
त्यांनी सांगितले की, मी शपथ घेतली होती की, जोपर्यंत अयोध्येत भव्य राम मंदिर बांधले जात नाही, तोपर्यंत माझ्या केसांना आणि दाढीला कापणार नाही. जर राम मंदिर तयार झाले नसते, तर आयुष्यभर मी केस कापले नसते. मागील 5 वर्षांपासून मी माझ्या संकल्पावर ठाम आहे. तसेच रुपेशला वाळूपासून सर्वात उंच राम मंदिराचे मॉडेल बनवायचे आहे.
advertisement
22 जानेवारीला होणार संकल्प -
अयोध्यामध्ये होणाऱ्या रामलला प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाच्या तयारी उत्साहात आहे. या कार्यक्रमात देशभरातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना आमंत्रणे पाठवली जात आहेत. आता अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने रुपेश सिंह यांचा महासकंल्प पूर्ण होणार आहे. यानंतर आता ते राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर आपले केस आणि दाढी कापणार आहे.
Location :
Ayodhya,Faizabad,Uttar Pradesh
First Published :
January 16, 2024 7:55 AM IST
मराठी बातम्या/देश/
ram mandir : असा अनोखा रामभक्त पाहिला नसेल, 5 वर्षांनी पूर्ण होणार हा 'महासंकल्प', नेमकं काय ठरवलं होतं?