माझा ऊस, माझी मशीन, माझं उत्पादन! लढवली अनोखी शक्कल, ऊसाने शेतकरी मालामाल
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
याबाबत ते लोकांनाही धडे देतात, तुम्हीही ऊस उत्पादनातून चांगला नफा मिळवू शकता, असं लोकांना ते प्रोत्साहित करतात.
पीयूष शर्मा, प्रतिनिधी
मुरादाबाद, 17 ऑगस्ट : कृषीतज्ज्ञ वारंवार सांगतात की, शेतकरी बांधवांनी अभ्यासपूर्ण शेती करावी, त्यातून त्यांना चांगला नफा मिळवता येऊ शकतो. तज्ज्ञांचा हाच सल्ला लक्षात घेऊन सध्या अनेक शेतकरी मंडळी शेतजमिनीत विविध प्रयोग करून आपल्या उत्पादनांना बाजारपेठेत मोठी मागणी मिळवून देतात.
ऊस उत्पादकांना योग्य भाव मिळत नाही, अशा बातम्या आपण अनेकदा ऐकतो. परंतु उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद भागातील बिलारीचे एक शेतकरी मात्र सध्या ऊस उत्पादनातून अक्षरशः मालामाल झाले आहेत. अरेंद्र असं त्यांचं नाव. त्यांच्या या प्रगतीचं कारण म्हणजे ते केवळ ऊस उत्पादन घेत नाहीत, तर ऊसाचे विविध पदार्थ बनवून त्यांची बाजारात विक्री करतात. त्यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळतं. शिवाय याबाबत ते लोकांनाही धडे देतात, तुम्हीही ऊस उत्पादनातून चांगला नफा मिळवू शकता, असं लोकांना ते प्रोत्साहित करतात.
advertisement
विशेष म्हणजे कोणाला ऊसापासून विविध पदार्थ बनवायला शिकायचं असेल, तर ते त्यांना मोफत प्रशिक्षण देतात. विकास भवनात त्यांचं ऊस उत्पादनांचं दुकान आहे. अरेंद्र यांनी सांगितलं की, 'ऊस उत्पादकांना योग्य भाव मिळत नाही, हीच बाब लक्षात घेऊन आम्ही 8 राज्यांमधील शेतकऱ्यांनी 'माझा ऊस, माझी मशीन, माझं उत्पादन' यावर काम करण्याचा विचार केला. आता आम्ही ऊसाच्या रसासह, ऊसाचे लाडू, ऊसाची खीर, ऊसाची आईस्क्रीम बनवून विकतो. या कोणत्याही पदार्थात केमिकलचा वापर होत नाही, पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने ते बनवले जातात.'
advertisement
त्याचबरोबर अरेंद्र यांनी 'आमच्यासह आणखी शेतकऱ्यांना काम करायचं असेल तर तेदेखील असं उत्पादन घेऊ शकतात. सर्व पदार्थ बनवायला त्यांना शिकवलं जाईल', असं म्हटलं. शिवाय येत्या काळात ऊसापासून जवळपास 15 पदार्थ बनवण्याचा त्यांचा मानस आहे.
view commentsLocation :
Moradabad,Uttar Pradesh
First Published :
August 17, 2023 3:28 PM IST


