उत्तराखंडमध्ये मृत्यूचं तांडव! ढगफुटीमुळे अनेकांचा बळी, राज्याला महापुराचा विळखा

Last Updated:

Uttarakhand Cloudburst :ढगफुटी सदृश्यं पाऊस झाल्याने धरण भरलं आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.

News18
News18
नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने विध्वंस केला. केदारनाथ यात्रेच्या मार्गावर ढग फुटी झाल्याने चालण्याच्या मार्गाचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला. मुसळधार पावसामुळे गौरीकुंडातही मंदाकिनी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. केदारनाथ यात्रेला गेलेले 250 भाविक अडकले असून त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि वायएमएफच्या टीम पाठवण्यात आल्या आहेत. राज्यातील अनेक भागात भूस्खलन, रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत. मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी सुरक्षेबाबत अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्यानुसार राज्यात मुसळधार पाऊस सुरूच राहणार आहे. राजधानी डेहराडूनमध्ये पावसाच्या अंदाजामुळे गुरुवारी शहरातील शाळा आणि अंगणवाडी केंद्र बंद ठेवण्यात आले आहेत.
advertisement
मुसळधार पावसामुळे चक्रता रोडवरील बिंदल नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. हरिद्वारमधील एका गावात पावसामुळे घराचे छत कोसळून दोन मुलांसह तिघांचा मृत्यू झाला. या अपघातात 8 जण गंभीर जखमी झाले आहेत.
उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये बुधवारी रात्री ढगफुटी झाली. केदारनाथमध्ये आताही भीषण परिस्थिती निर्णय झाली आहे. त्यामुळे अनेक भाविक अडकल्याची माहिती मिळाली आहे. या भाविकांना सुखरुप ठिकाणी घेऊन जाण्याचं काम सुरू आहे.
advertisement
advertisement
या ढगफुटीमुळे मोठे नुकसान होत असल्याची माहिती मिळाली आहे. केदारनाथ धामजवळ ढगफुटीमुळे मंदाकिनी नदीला भीषण पूर आला आहे. केदारधाम ते गौरीकुंडपर्यंत भाविकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. मुसळधार पावसामुळे डेहराडूनच्या काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
ढगफुटी सदृश्यं पाऊस झाल्याने धरण भरलं आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. आधीच पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आणि त्यात धरणाचे दरवाजे उघडल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. त्यामुळे सध्या केदारनाथ आणि उत्तराखंडमध्ये भयंकर स्थिती आहे.
मराठी बातम्या/देश/
उत्तराखंडमध्ये मृत्यूचं तांडव! ढगफुटीमुळे अनेकांचा बळी, राज्याला महापुराचा विळखा
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement