Bridge Accident : एक्सिडंट आणि 20 फूट खाली पडली बाईक आणि.... उंच पुलावर झालेल्या अपघातात घडला चमत्कार

Last Updated:

एका 20 वर्षाच्या तरुणासोबत नेमकं असंच काहीसं घडलंय, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय देणारी एक अत्यंत थरारक घटना गुजरातच्या वडोदरा शहरात घडली आहे. आपण रोज रस्त्यावरून प्रवास करतो, कधी ऑफिसला जाण्यासाठी तर कधी कामासाठी आपण कार, बाईक, बस सारख्या वाहनांतून प्रवास करतो. पण या सगळ्यात जेव्हा आपण रस्ते अपघातांच्या बातम्याही ऐकतो, तेव्हा नेहमीच एक भीती मनात बसते. या अपघातात कधी एकाद्याचे प्राण थोडक्यात बचावतात, तर काही गंभीर जखमी होतात. अपघातात प्राण गेलेल्या लोकांचा आकडापण मोठा आहे.
पण कधीकधी नियती असा काही चमत्कार घडवते की, मृत्यूच्या दाढेतून माणूस सुखरूप बाहेर येतो. वडोदऱ्यातील एका तरुणासोबत नेमकं असंच काहीसं घडलंय, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नेमकी घटना काय होती आणि त्या 20 वर्षीय तरुणाचा जीव एका शर्टमुळे कसा वाचला? जाणून घेऊया हा अंगावर काटा आणणारा घटनाक्रम
advertisement
नेमकं काय घडलं?
आनंद जिल्ह्यातील अदास गावात राहणारा सिद्धराज सिंह महिदा (20) हा रविवारी आपल्या मोपेडवरून वडोदऱ्याच्या दिशेने जात होता. नंदेसरी पुलावरून (Nandesari Bridge) जात असताना मागून येणाऱ्या एका भरधाव कारने सिद्धराजच्या गाडीला जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की सिद्धराज गाडीवरून हवेत उडाला आणि थेट पुलाच्या संरक्षक भिंतीबाहेर फेकला गेला.
advertisement
20 फूट खोल दरीत कोसळणार इतक्यात एक चमत्कार झाला. सिद्धराजचा शर्ट पुलाच्या एका खांबाला असलेल्या खिळ्यामध्ये अडकला आणि तो तरुण हवेतच लटकला.
देवदूतासारखे धावून आले अश्विन सोलंकी
हा सर्व थरार अश्विन सोलंकी नावाचा तरुण आपल्या वडिलांसह मागून पाहत होता. अश्विनने क्षणाचाही विलंब न लावता आपली गाडी थांबवली आणि पुलाच्या काठावर धाव घेतली. सिद्धराज खांबाला लटकलेला पाहून अश्विन आणि त्यांच्या वडिलांनी तात्काळ त्याचे हात पकडले.
advertisement
अश्विन सोलंकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही पाहिले तर सिद्धराजचा शर्ट एका खिळ्यात अडकला होता, त्यामुळे तो खाली पडला नाही. आम्ही त्याला घट्ट पकडून ठेवले आणि त्यानंतर पुलावर थांबलेल्या इतर 5-6 जणांच्या मदतीने त्याला सुरक्षितपणे वर ओढून घेतले."
advertisement
वर ओढल्यानंतर सिद्धराज प्रचंड धक्क्यात होता आणि तो बेशुद्ध पडला होता. उपस्थित लोकांनी तात्काळ 108 रुग्णवाहिकेला बोलावले आणि त्याला सयाजीराव रुग्णालयात दाखल केले. सर्वांना भीती होती की त्याला गंभीर दुखापत झाली असेल, पण डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. सिद्धराजला केवळ किरकोळ जखमा झाल्या होत्या. संध्याकाळी त्याच्या कुटुंबीयांनी त्याला घरी नेले.
advertisement
नंदेसरी पोलीस ठाण्याचे पीआय ए.ए. वाघेला यांनी सांगितले की, "अपघाताची माहिती मिळताच आमचे पथक रुग्णालयात पोहोचले होते. तरुणाचा जीव वाचला हे मोठे नशीब आहे. धडक देऊन पळून गेलेल्या कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्याचा शोध घेतला जात आहे."
हा अपघात आपल्याला पुन्हा एकदा सांगून जातो की, रस्त्यावर वाहन चालवताना सावधानता किती महत्त्वाची आहे. पण त्याचसोबत अश्विन सोलंकींसारखी माणुसकी आजही जिवंत आहे, म्हणूनच सिद्धराजसारख्या तरुणाला आज पुनर्जन्म मिळाला आहे. तुमच्या प्रवासातही नेहमी सतर्क राहा आणि कोणाला मदतीची गरज असेल तर मागे हटू नका.
view comments
मराठी बातम्या/देश/
Bridge Accident : एक्सिडंट आणि 20 फूट खाली पडली बाईक आणि.... उंच पुलावर झालेल्या अपघातात घडला चमत्कार
Next Article
advertisement
Nagar Parishad Election : ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षानं मैदान मारलं
ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा
  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

View All
advertisement