Team India : वर्ल्ड कप टीमची घोषणा होताच भारतीय क्रिकेटपटूची निवृत्ती, 14 वर्षांच्या करिअरचा शेवट!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियाची घोषणा होताच भारतीय क्रिकेटपटूने निवृत्तीची घोषणा केली आहे.
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. शुभमन गिलला टीम इंडियामधून बाहेर केल्यामुळे बराच वाद निर्माण झालेला असतानाच भारतीय क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली आहे. 14 वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर या क्रिकेटपटूने निवृत्तीची घोषणा केली आहे.
कर्नाटकचा ऑलराऊंडर आणि आयपीएलमध्ये बऱ्याच मॅच विनिंग खेळी करणाऱ्या कृष्णप्पा गौतमने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. कृष्णप्पा गौतमने खालच्या क्रमांकावर पॉवर हिटिंग करून आणि ऑफ स्पिन बॉलिंगने कर्नाटकला बऱ्याच मॅच जिंकवल्या. गौतमने 2012 च्या रणजी ट्रॉफी मोसमात कर्नाटककडून पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच सामन्यात गौतमने उत्तर प्रदेशच्या सुरेश रैना आणि भुवनेश्वर कुमारची विकेट घेतली.
advertisement
ऑलराऊंड कामगिरीमुळे कृष्णप्पा गौतमने कर्नाटकच्या टीममधलं त्याचं स्थान पक्कं केलं. 2016-17 च्या रणजी ट्रॉफी मोसमात गौतमने फक्त 8 सामन्यांमध्ये 27 विकेट घेतल्या. यानंतर पुढच्याच वर्षी त्याने आसामविरुद्ध पहिलंच प्रथम श्रेणी शतक झळकावलं. 59 प्रथम श्रेणी आणि 68 लिस्ट ए सामन्यांमध्ये गौतमने 320 विकेट घेतल्या.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर कृष्णप्पा गौतमची इंडिया ए साठीही निवड झाली. न्यूझीलंड ए, ऑस्ट्रेलिया ए, वेस्ट इंडिज ए आणि इंग्लंड लायन्सविरुद्धच्या सामन्यांमध्येही कृष्णप्पा गौतम इंडिया ए कडून खेळला. 2021 साली गौतम टीम इंडियाचा नेट बॉलर होता, यानंतर त्याची श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय टीममध्ये निवड झाली. या दौऱ्यात गौतम कोलंबोमध्ये एकमेव टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळला, ज्यात त्याला एक विकेटही मिळाली. यानंतर मात्र त्याला पुन्हा आंतरराष्ट्रीय मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही.
advertisement
सीएसकेने दिले 9.25 कोटी रुपये
आयपीएलमध्ये गौतम मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स, सीएसके, लखनऊ या टीमकडून खेळला. 2021 च्या आयपीएल लिलावात चेन्नईने गौतमला 9.25 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. 9 आयपीएल मोसमांमध्ये गौतमने 35 कोटी रुपये कमावले. तर कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये गौतमने 2019 साली बेल्लारी टस्कर्सकडून खेळताना 56 बॉलमध्ये 134 रनची वादळी खेळी केली, ज्यात 13 सिक्सचा समावेश होता. 39 बॉलमध्ये गौतमने त्याचं शतक पूर्ण केलं होतं. यानंतर त्याने 4 ओव्हरमध्ये 15 रन देऊन 8 विकेटही घेतल्या. भारतीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासातली ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 22, 2025 6:13 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : वर्ल्ड कप टीमची घोषणा होताच भारतीय क्रिकेटपटूची निवृत्ती, 14 वर्षांच्या करिअरचा शेवट!









