पृथ्वीवर सूर्य उतरणार! सर्वांना मिळणार 24 तास वीजच वीज, जाणून घ्या न्यूक्लियर फ्यूजन प्लांट
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
हायड्रोजन आधारित ऊर्जा वापरून अमेरिकेत 2030 पर्यंत ग्रिड-स्केल न्यूक्लियर फ्यूजन प्लांट उभारला जाणार आहे. हा प्रकल्प स्वच्छ ऊर्जा निर्माण करून लाखो घरे उजळणार आहे. सूर्याप्रमाणे ऊर्जा निर्माण करणाऱ्या या तंत्रज्ञानामुळे कार्बनमुक्त वीज उपलब्ध होईल.
आत्तापर्यंत आपण सौर ऊर्जा आणि अणुऊर्जेबद्दल खूप ऐकलंय, पण लवकरच जगात वीज निर्मितीसाठी हायड्रोजन आधारित ऊर्जेचा वापर होणार आहे. अमेरिकेत जगातील पहिलं "ग्रिड-स्केल न्यूक्लियर फ्यूजन" वीज प्रकल्प उभारला जाणार आहे. जर हे यशस्वी झालं, तर भविष्यात वीजेची कमतरता भासणार नाही.
हे काही साधा वीज प्रकल्प नाही. हायड्रोजन आधारित ऊर्जा ही स्वच्छ ऊर्जा (क्लीन एनर्जी) आहे. हा प्रकल्प सूर्य ज्या तंत्रज्ञानाने ऊर्जा निर्माण करतो, त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून वीज निर्मिती करणार आहे. अंदाज आहे की, हा प्रकल्प 2030 पर्यंत पूर्ण होईल. जर हे घडलं, तर हा प्रकल्प कार्बन उत्सर्जनाशिवाय दशकानुदशके वीज निर्माण करू शकेल. या प्रकल्पातून सुरुवातीला 400 मेगावॉट वीज निर्मिती करण्याचा उद्देश आहे, ज्यामुळे सुमारे 1.5 लाख घरे उजळतील.
advertisement
कॉमनवेल्थ फ्यूजन सिस्टम्स नावाची स्टार्टअप कंपनी या स्वच्छ ऊर्जा प्रकल्पावर काम करत आहे. यासाठी सीएफएस आणि प्रसिद्ध कंपनी रिचमंड यांनी काही अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.
सोप्या भाषेत सांगायचं, तर न्यूक्लियर फ्यूजन म्हणजे दोन अणू मिळून ऊर्जा निर्माण करतात. अणुऊर्जेत अणू फोडले जातात आणि ऊर्जा तयार होते. हायड्रोजन ऊर्जेत मात्र अणू एकत्र येतात, तेव्हा ऊर्जा तयार होते. हे अणू सतत फूटतात आणि पुन्हा एकत्र येतात, ज्यामुळे वारंवार ऊर्जा तयार होते. ही ऊर्जा स्वच्छ मानली जाते. हे तंत्रज्ञान सूर्याच्या ऊर्जा देणाऱ्या प्रक्रियेशी मिळतंजुळतं आहे.
advertisement
हे जगातील पहिलं तंत्रज्ञान असेल, जिथे प्लाझ्मा फ्यूजनवर आधारित ऊर्जा पुरवली जाईल. पण ही तंत्रज्ञान आणखी प्रायोगिक टप्प्यात आहे. त्यामुळे ही प्रक्रिया तितकी सोपी नाही. सध्या जगभरात स्वच्छ ऊर्जा स्वीकारण्याच्या दिशेने पावलं उचलली जात आहेत. पृथ्वी वाचवण्यासाठी कार्बन उत्सर्जन टाळणाऱ्या ऊर्जा स्रोतांचा अवलंब करायचा आहे. न्यूक्लियर फ्यूजन ही अशी ऊर्जा आहे, जी कधीही संपणार नाही.
advertisement
न्यूक्लियर फ्यूजन वीज प्रकल्प यशस्वी झाल्यास, जगासाठी स्वच्छ आणि कायमस्वरूपी ऊर्जा स्रोत तयार होईल. ऊर्जा क्षेत्रात हा क्रांतिकारी बदल ठरेल.
हे ही वाचा : Tractor Battery Tips: ट्रॅक्टरची बॅटरी वारंवार खराब होतेय का? मग या टिप्स फॉलो करुन बॅटरीची लाईफ वाढवा
हे ही वाचा : एसटीचा 1 रुपयात 10 लाखांचा विमा, काय आहे बाळासाहेब ठाकरे अपघात साहाय्यता निधी योजना? पाहा संपूर्ण माहिती
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 19, 2024 12:30 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
पृथ्वीवर सूर्य उतरणार! सर्वांना मिळणार 24 तास वीजच वीज, जाणून घ्या न्यूक्लियर फ्यूजन प्लांट


