advertisement

अदाणी पॉवरने केली बांगलादेशाची बत्ती गुल! घरांपासून कारखान्यांपर्यंत वीजटंचाईचा बसला मोठा फटका

Last Updated:
News18
News18
मागील काही महिन्यांपासून सतत संकटांचा सामना करणाऱ्या बांगलादेशला आता वीजटंचाईमुळे मोठा फटका बसला आहे. भारतातील अदाणी पॉवर झारखंड लिमिटेड (APJL) ने वीज पुरवठा 50 टक्क्यांनी कमी केला आहे. ही कारवाई 846 कोटी डाॅलर इतक्या थकबाकीमुळे करण्यात आली आहे. अदाणी पॉवरकडून बांगलादेशला थकबाकी भरण्याची विनंती सातत्याने केली जात होती. अदाणी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनीदेखील कार्यवाह पंतप्रधान मोहम्मद युनूस यांना पैसे भरण्यासाठी पत्र लिहिले होते.
अदाणी ग्रुपचा थकबाकीमुळे पुरवठा कमी : शुक्रवारी 'डेली स्टार' या वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, पॉवर ग्रिड बांगलादेश पीएलसीच्या आकडेवारीत गुरुवारी रात्री अदाणी ग्रुपच्या वीज प्रकल्पाने पुरवठा कमी केल्याचे दिसून आले. माध्यमांच्या अहवालानुसार, गुरुवार ते शुक्रवारच्या रात्री बांगलादेशला 1600 मेगावॅटपेक्षा जास्त वीजटंचाईचा सामना करावा लागला. अदाणी पॉवरच्या 1496 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पातून केवळ 700 मेगावॅट वीज एका युनिटमधून निर्मित होत आहे.
advertisement
थकबाकी भरावी, अन्यथा वीज पुरवठा थांबवू : अदाणी पॉवरने यापूर्वी बांगलादेशच्या ऊर्जा सचिवांना पत्र लिहून बांगलादेश इलेक्ट्रिसिटी डेव्हलपमेंट बोर्डला (PDB) थकबाकी 30 ऑक्टोबरपर्यंत भरण्याची विनंती केली होती. 27 ऑक्टोबरला लिहिलेल्या पत्रात अदाणी ग्रुप कंपनीने नमूद केले होते की, थकबाकी न भरल्यास 31 ऑक्टोबरपासून वीज पुरवठा थांबवून उपाययोजना कराव्या लागतील.
कंपनीने सांगितले की, PDB ने ना बांगलादेश कृषी बँकेकडून 170 कोटी डाॅलर कर्ज घेतले, पण थकबाकी भरली नाही. PDB अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, मागील थकबाकीचा काही भाग भरला गेला, पण जुलैपासून APJL ने पूर्वीपेक्षा जास्त शुल्क लावले आहे. सध्या PDB आठवड्यातून 18 कोटी डाॅलर देत आहे, मात्र शुल्क 22 कोटी डाॅलरपेक्षा जास्त आहे, त्यामुळे थकबाकी वाढत आहे.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/आंतरराष्ट्रीय/
अदाणी पॉवरने केली बांगलादेशाची बत्ती गुल! घरांपासून कारखान्यांपर्यंत वीजटंचाईचा बसला मोठा फटका
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement