Good News : अमेरिकेत नोकरी करणं भारतीयांसाठी होणार सोपं, H1B व्हिसा नियमांत मोठे बदल

Last Updated:

H1B Visa New Rules: अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. नॉन एमिग्रंट व्हिसा अर्जदारांसाठी नवीन नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू केले जाणार आहेत.

News18
News18
अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. नॉन एमिग्रंट व्हिसा अर्जदारांसाठी नवीन नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू केले जाणार आहेत. अमेरिकन दूतावासाने बुधवारी (18 डिसेंबरला) व्हिसा ॲप्लिकेशन प्रोसेस सुरळीत करण्यासाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. आता व्हिसा प्रोसेस पूर्ण व्हायला कमी वेळ लागेल, ज्यामुळे अर्जदारांना जास्त वाट पाहावी लागणार नाही. तसेच व्हिसा मुलाखतीच्या भेटीसाठी प्रत्येकाला योग्य संधी दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
“प्रत्येकाला व्हिसा इंटरव्ह्यु अपॉइंटमेंटची योग्य संधी मिळावी आणि वेटिंग टाईम कमी करण्यासाठी आम्ही काही बदल करत आहोत,” असं अमेरिकन दुतावासाने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अमेरिकेच्या या निर्णयाचा हजारो भारतीय ‘टेकीं’ना फायदा होईल. अमेरिकेत पायउतार होत असलेल्या बायडेन सरकारने H-1B व्हिसाचे नियम शिथिल करून अमेरिकेतील कंपन्यांना परदेशी नोकरदारांना नोकरीवर ठेवण्यासाठी एक सोय करून दिली आहे, असं मानलं जात आहे. यामुळे अमेरिकी कंपन्या परदेशातील कुशल लोकांना नोकरीवर ठेवू शकतील, जेणेकरून F-1 स्टुडंट व्हिसावर असलेल्या भारतीय लोकांना H-1B व्हिसा मिळवून अमेरिकेत नोकरी करू शकतील.
advertisement
अमेरिकन दूतावासाने म्हटलं की व्हिसा रिशेड्युलिंग पॉलिसींमध्ये आता बदल करण्यात आले आहेत. व्हिसा अर्जदार आता त्यांच्या अपॉइंटमेंट्स मोफत रिशेड्युल करू शकतील. जर काही कारणांनी त्यांची अपॉइंटमेंट चुकली असेल किंवा दुसऱ्यांदा शेड्युल करण्याची गरज असेल तर त्यांना ॲप्लिकेशन फी रीपे करावी लागेल.
“1 जानेवारी 2025 पासून तुम्ही तुमच्या आवडत्या ठिकाणी तुमची पहिली नॉन-एमिग्रंट व्हिसाची अपॉइंटमेंट शेड्युल करू शकता. तुम्हाला कोणत्याही कारणाने अपॉइंटमेंट रिशेड्युल करायची असेल तर तुम्ही ते एकदाच मोफत करू शकाल. तुमची अपॉइंटमेंट चुकल्यास किंवा दुसऱ्यांदा रिशेड्युल करण्याची गरज भासल्यास तुम्हाला नवीन अपॉइंटमेंट बुक करावी लागेल आणि तुमची ॲप्लिकेशन फी परत भरावी लागेल. वेटिंग टाईम खूप जास्त आहे, त्यामुळे सर्वांनी निवडलेल्या तारखेला अपॉइंटमेंटसाठी उपस्थित राहण्याची दक्षता घ्यावी,” असं अमेरिकन दूतावासाने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
advertisement
“या बदलांमुळे प्रत्येकाला अपॉइंटमेंट मिळणं सोपं आणि फास्ट होईल. या प्रक्रियेत काहीही अडचण येऊ नये व सुरळीत पार पडावी, यासाठी सर्वांना त्यांनी घेतलेल्या अपॉइंटमेंटसाठी उपस्थित राहण्याची विनंती करत आहोत," असंही पोस्टमध्ये लिहिलं आहे.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
Good News : अमेरिकेत नोकरी करणं भारतीयांसाठी होणार सोपं, H1B व्हिसा नियमांत मोठे बदल
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement