BREAKING : 105 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान हेलकावे खात कोसळलं
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Kazakhstan Flight Crash: कझाकस्तानच्या अक्ताऊ विमानतळाजवळ एका प्रवाशी विमानाला मोठा अपघात झाला आहे. यात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
कझाकस्तान : कझाकस्तानच्या अक्ताऊ विमानतळाजवळ एका प्रवाशी विमानाला मोठा अपघात झाला आहे. यात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात सहा जण बचावले आहेत, याबाबतची माहिती कझाकस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयाने दिली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला असून विमान अक्ताऊ विमानतळ परिसरात कोसळताना दिसत आहे.
विमान धावपट्टीवर लँडींग करत असताना, समतोल बिघडून हा अपघात झाल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हा अपघात नेमका कसा झाला, याची अधिकची माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या विमानातून 105 प्रवासी प्रवास करत होते. तसेच विमानात इतर पाच कॅबिन क्रू मेंबर देखील होते.
Azerbaycan Hava Yolları'na ait Bakü-Grozni seferini yapan yolcu uçağı Kazakistan'ın Aktau kentinde düştü#asgariücret Özgür Özel #GenelGrev Merry Christmas #yanındayızHüseyinBaş Hüseyin Baş #MemurGeçinemiyor Cemal #Balıkesir iPhone 16 #Kazakistan #Azerbaycan #uçak #kaza pic.twitter.com/9M7C65oePb
— ANTALYA GÜNDEM GAZETESİ (@antalyagundemg5) December 25, 2024
advertisement
अझरबैजन एअरलाइन्सचं हे विमान बुधवारी अझरबैजनच्या बाकू येथून रशियातील चेचन्या इथे जात होतं. दरम्यान या विमानाला कझाकस्तानच्या अक्ताऊ विमानतळाजवळ मोठा अपघात झाला आहे. या अपघातात अनेक लोक मृत्यूमुखी पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत विमानाने हेलकावे खात लँडींग करण्याचा प्रयत्न केला. यानंतर विमानात स्फोट झाल्याचं दिसत आहे. यानंतर धुराचे लोट घटनास्थळी दिसून आले आहेत.
view commentsLocation :
Delhi,Delhi
First Published :
December 25, 2024 1:30 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
BREAKING : 105 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान हेलकावे खात कोसळलं


