कझाकस्तानमध्ये विमान कोसळलं, मृतांचा आकडा 38 वर, अपघाताचं कारणही आलं समोर

Last Updated:

Kazakhstan Plane Crashed : बुधवारी कझाकस्तानमधील अक्ताऊ विमानतळावर प्रवाशी विमान कोसळलं आहे. यात 38 लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे.

News18
News18
अक्ताऊ : बुधवारी कझाकस्तानमधील अक्ताऊ विमानतळावर प्रवाशी विमान कोसळलं आहे. यात 38 लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 29 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. जखमी प्रवाशांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध आणि ड्रोन हल्ल्याची शक्यता, यामुळे हे विमान इमर्जन्सी लँडींगसाठी अझरबैजानला वळवण्यात आलं होतं. मात्र इमर्जन्सी लँडींग करत असताना या विमानाला अपघात झाला. या अपघाताचे अनेक व्हिडीओज समोर आले असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
रॉयटर्सनं दिलेल्य वृत्तानुसार, अझरबैजान एअरलाइन्सची फ्लाइट क्रमांक J2-8243 ने अझरबैजानमधील बाकू विमानतळावरून उड्डाण घेतलं होतं. ते विमान रशियातल्या चेचण्या राज्यातील ग्रोन्जीला निघालं होतं. मात्र पक्षांच्या हल्ल्यामुळे या विमानाचं आपत्कालीन लँडींग करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी प्राथमिक माहिती समोर आली.
मात्र सध्या रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध सुरू आहे. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला रशियाने युक्रेनवर ड्रोन हल्ला केला होता. त्यामुळे युक्रेनकडून प्रति ड्रोनहल्ला होण्याची शक्यता होती, ही बाब लक्षात घेऊन या विमानाचा मार्ग बदलण्यात आला. कझाकस्तानच्या अक्ताऊ विमानतळावर या विमानाचं आपत्कालीन लँडिंग केलं जाणार होतं. पण तत्पूर्वी विमानाचा अपघात झाला, अशी माहिती इंडिया टुडेनं दिली आहे.
advertisement
ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी विमानातून 67 प्रवासी प्रवास करत होते, यातल्या 38 जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर 29 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. ज्यावेळी अपघात झाला, त्यावेळी काही जखमी लोकांनी एकमेकांची मदत करत एकमेकांना वाचवलं आहे. कझाकस्तानचे उपपंतप्रधान कनत बोझुम्बाइव्ह यांनी या घटनेची पुष्टी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
कझाकस्तानमध्ये विमान कोसळलं, मृतांचा आकडा 38 वर, अपघाताचं कारणही आलं समोर
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement